चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुण्यातील दोन आरोपींना सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुससह घेतले ताब्यात

चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुण्यातील दोन आरोपींना सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुससह घेतले ताब्यात

चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुण्यातील दोन आरोपींना सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुससह घेतले ताब्यात

✍️विशाल सुरवाडे✍️
जळगाव ब्युरो चीफ
📱मो.9595329191📱

जळगाव – जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत लासुर ते हातेड रस्त्यावर गोपनीय माहितीच्या आधारे दोन इसाम येत असल्याची बातमी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथकाला मिळाले असता त्यांनी त्या इसमांना थांबून तपासणी केली असता त्यांच्याजवळ सात कट्टे व दहा जिवंत काडतुस आढळून आले.
पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी अप्पर ,पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन यांच्या पथकाने चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सात गावठी कट्टे, दहा जिवंत काडतूस,दोन मोबाईल एक बाईक दोन आरोपींसह पकडण्यात आलेली आहे. सदरचा संपूर्ण मुद्देमाल हा दोन लाख नव्वद हजार रकमेचा आहे.सदर पुण्यातील आरोपी सागर शरणम रणसौरे वय 24 राहणार धायरी फाटा पर्वती पुणे तसेच दोन नंबर आरोपी मनोज राजेंद्र खांडेकर वय 25 राहणार जुळेवाडी तालुका कराड जिल्हा पुणे असे अटकेत असून त्यांना दिनांक 24 /9 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here