ग्राम पंचायतीच्या विकास कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी मागितली लाखो रुपयांची लाच,ग्राम विस्तार अधिकारीसह दोन्हींवर गुन्हा दाखल

ग्राम पंचायतीच्या विकास कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी मागितली लाखो रुपयांची लाच,ग्राम विस्तार अधिकारीसह दोन्हींवर गुन्हा दाखल

ग्राम पंचायतीच्या विकास कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी मागितली लाखो रुपयांची लाच,ग्राम विस्तार अधिकारीसह दोन्हींवर गुन्हा दाखल

✍️निलेश सोनवणे✍️
नंदगाव प्रतिनिधी
📱मो.99227 83478📱

जळगांव – जिल्ह्यातील तालुका पारोळा येथील धूळ पिंप्री गावातील ग्राम पंचायतीच्या विकास कामांसाठी मंजूर निधीची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी ग्राम विस्तार अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी लाच घेतल्या प्रकरणी पारोळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की धूळ प्रिंप्री येथील तक्रारदार हे सरपंच यांचा मुलगा असून त्यांचे गावातील ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत काँक्रिट व पेव्हर ब्लॉक चे एकूण चार कामाचे प्रत्येकी 15 लाख रुपये प्रमाणे एकूण साठ लाखाचे काम शासनाकडून मंजूर होवून आले होते. सदर कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी श्री.कल्पेश बेलदार वय 28 या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने स्वतः साठी एक टक्का व ग्राम विस्तार अधिकारी श्री.सुनील पाटील यांच्यासाठी दोन टक्के प्रमाणे एक लाख पंच्यानशी हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे दि.10/09/2024 रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता श्री.सुनील पाटील यांना प्रोत्साहन दिले असता श्री.कल्पेश बेलदार यांनी पंचासमक्ष तडजोड अंती एक लाख रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम एक लाख रुपये स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर पारोळा पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
श्री. योगेश ठाकूर पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव यांच्या सूचनेनुसार त्यांच्या सापळा पथक मधून पो.हे.कॉ/सुनिल वानखेडे,पोना.किशोर महाजन,पोना.बाळू मराठे ,नैत्रा जाधव,पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक
पो.हे.कॉ,सुरेश पाटील,पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर,प्रदीप पोळ,प्रणेश ठाकुर,सचिन चाटे यांनी कार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here