नाशिकमध्ये पत्रकारांवर जीवघेणा भ्याड हल्ल्या
अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पत्रकार विदर्भ विभागा कडून जाहीर तीव्र निषेध
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो ९८६००२००१६
चंद्रपूर :- नाशिक (त्र्यंबकेश्वर) परिसरात आज वृत्तांकन करत असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार किरण तांबोळे, योगेश खरे, अभिजीत सोनवणे आदी पत्रकारांवर स्थानिक गुंडांकडून करण्यात आलेला भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय असून, अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन – पत्रकार विभाग या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
पत्रकारितेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांविरोधात तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम मागणी आहे. या हल्ल्यामागे कोणाचे संरक्षण वा पाठबळ आहे, याचीही कसून चौकशी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
गेल्या काही काळात नाशिकसह राज्यभर पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. यामागे राजकीय आश्रय असल्याचेही दिसून येते. कोणताही राजकीय पक्ष अशा गुंडांना आश्रय न देता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.
पत्रकार समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार जनतेसमोर आणतात. पत्रकार सुरक्षित राहतील, तरच लोकशाहीची चौथी स्तंभ म्हणून पत्रकारिता सक्षमपणे उभी राहू शकेल. त्यामुळे पोलिस प्रशासनाने हल्लेखोरांना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, हीच आमची मागणी आहे.
विदर्भ अध्यक्ष : मनोज एल खोब्रागडे