कालिना विधानसभा सरचिटणीस विजय सकपाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कालिना विधानसभा सरचिटणीस तसेच श्री गावडेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आयु. विजय पांडुरंग सकपाळ यांचा वाढदिवस दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी पतसंस्था कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून सकपाळ यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवस सोहळ्याची सुरुवात धार्मिक विधींनी झाली. राजेश भोसले यांच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या विधीत अनेक मान्यवरांनी सहभागी होत सकपाळ यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला रिपाइं कालिना विधानसभा अध्यक्ष श्रावण मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) विधानसभा अध्यक्ष सुरेंद्र भोसले, काँग्रेस ब्लॉक क्र. ९१ चे अध्यक्ष आशिष मोरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप शिर्के आणि नरेंद्र भोसले प्रमुख विशेषतः उपस्थित होते. विविध पक्षातील नेत्यांची उपस्थिती हा सकपाळ यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीचा प्रत्यय असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचाही कार्यक्रमाबद्दल उत्साह होता. नितिन कांबळे, सुनील सकपाळ, लखन मगर, दयानंद सावंत, राजेश यादव, अनिल पवार, अर्जुन प्रसाद, अजय जाधव, राजेंद्र मोहिते, चेतन सकपाळ, रोहित मोहिते, जयकिशन सरसावल यांच्यासह अनेकांनी वाढदिवस सोहळ्यात सहभाग घेतला.
या निमित्ताने बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, विजय सकपाळ यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी युवकांना संघटित करून समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गावडेश्वर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना आर्थिक मदत व आधार मिळाला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सकपाळ यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी पाठिंबा दर्शविला.









