संभाजी ब्रिगेडचे तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम:- कधी अस्मानी तर कधी सुलतानी तर संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दोन चार वर्षापासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्यामुळे पिकाचे उत्पन्न घटले आहे. व बोगस बियाणे मुळे सर्व शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोना च्या प्रभावामुळे शेतकऱ्यांना योग्य असा बाजार भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर वेळ येण्याची दिसून येत आहे.
या हंगामात पीक चांगले आले होते परंतु परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाअगोदरही किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी बांधव त्रस्त झाला होता. आता शेतात खूप कष्ट करुन घाम गाळला तर, निसर्गाने दगा देऊन हाती आलेले पीक गमावले. सोयाबीन काळे पडले असून गंजीसुध्दा खराब झाली आहे. कापसाची बोंड खराब झाले असून तूरीचे सुध्दा नुकसान झाले आहे. सुरवातीला बियाणे खराब निघाले नंतर किडीचा प्रादुर्भाव व आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसगट पन्नास हजार मदत म्हणून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करण्याचे आदेश द्यावेत ह्या प्रमुख मागण्या घेऊन संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने मंगरूळपीर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले वरील मागणी तात्काळ पूर्ण कराव्या अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाप्रमुख गणेश चिपडे गणेश गावंडे अजय गवारगुरु शुभम मनवर ांच्या स्वाक्षर्या आहेत