समता सैनिक दल शाखा आगरगाव संघटकपदी आदर्श हाडके यांची निवड.
प्रतिनिधी
वर्धा/आगरगाव:येथील सामाजिक कार्यकर्ते आदर्श हाडके यांच्या सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत समता सैनिक दल शाखा आगरगाव संघटकपदी निवड करण्यात आली आहे.त्यांना समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्यांनी यावेळी आंबेडकरी आंदोलनाचा निळा ध्वज कुठल्याही संकटाची पर्वा न करता प्राणपणाने खांद्यावर वाहून नेईल अशी प्रतिबद्धतेची शपथ घेतली.
त्यांनी नियुक्तीबद्दल समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश निमसडकर, जिल्हा-सहसंघटक स्वप्निल कांबळे,जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, आंबेडकरी पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत, वर्धा जिल्हा समन्वयक गौतम देशभ्रतार,रिपब्लिकन नेते श्यामराव डहाके, जिवनप्रकाश निमसडकर, नारायण मून, मिलिंद मून, दिनेश वाणी, विनोद जवादे, सुनील बाभळे, अनील खडतकर, अजय गोटे, अजय मून, अरविंद माणिककूळे यांचे आभार मानले.
तसेच त्यांचे रौनक हाडके, सुरज वाघमारे, अक्षय फुलझेले, प्रणय थुल, संकेत हांडे, गजानन भोयर, हर्षल उईके,धनंजय धाडसे, प्रतीक भगत, कु.प्रतीक्षा हाडके, अचिन पवार, सिद्धांत मून, मनोज थुल, अक्षय शेन्डे, शुभम बागडे, सम्यक नगरकर, बिट्टू झामरे, निखिल भगत, अविनाश गायकवाड, सुमित शेंदरे, राजेंद्र कांबळे, विजय उमरे, नयन खोब्रागडे, अमोल ताकसांडे, चंदु भगत, रोशन लोहकरे, आकाश पाझारे, सुरज मोडक, गौतम जुल्मे, हर्षल पाटील, विकास वावरे, राहुल तेलंग, हर्षल करताल,नयन करताल, राहुल उके, निखिल उके, सुधीर मोरापे, समीर भस्मे, मोनाल भस्मे, संकल्प कांबळे, ऋषीकेश वाणी, दिक्षीत वाणी, प्रदीप लोखंडे, संदीप लोखंडे आदींनी अभिनंदन केले.