वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुका लढणारः अरविंदभाऊ सांदेकर विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी

अरुण भाले
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड प्रतिनीधीःवंचित बहुजन आघाडी नागभीडच्या वतीने विश्राम गृह नागभीड येथे पञकार परीषद घेण्यात आली. येणाऱ्या जि.प व पं.स.निवाडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहेत. पुर्व विदर्भातील पांच जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी दमदार प्रदर्शन करेल हा आमचा विश्वास आहे असे अरविंद सांदेकर बोलत होते.केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे.आरक्षण विरोधी आहे.ओबिसीची जनगनना होणार नाही हे केंद्र सरकार सांगत आहे.इंपेरीअल डाटा देण्यास तयार नाही.स्वातंत्र्यानंतरही ओबिसीची जनगनना झाली नाही. हे या देशाची शोकांतीका आहे. या देशात बेरोजगारी आहे. रोजगार मिळत नाही.आरोग्य सेवा ढिसाळ आहे.पेट्रोल ,डिझेल,गँसचे भाव सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे.असे अनेक मुद्दे पञकार परीषदेत मांडले. वंचित बहुजन आघाडी जिल्यात दमदार काम करेल.सर्वाना घेऊन चालणारा जर कोणता पक्ष असेल तर तो वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. या पक्षात सर्व जातीला प्राधान्य दिल्या जाते.ईतर कोणत्याही पक्षात घराणेशाही पहायला मीळते हे सर्व जनता जानते आहे. येणाऱ्या जि.प. व.पं.स.निवडणुका अकोला पँटर्ण नुसार लढु आणी जिंकुण दाखवु असा आत्मवीश्वास अरविंद सांदेकर यांनी व्यक्त केला.गाव तेथे वंचित आघाडी असे समिकरण सुरु आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुका पुर्ण ताकदनीशी लढु असेही बोलत होते.जिल्ह्यात तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी असेल. या पञकार परीषदेला कुशलभाऊ मेश्राम ,अरविंद सांदेकर,जयदिप खोब्रागडे,मधुभाऊ वानखेडे,आश्विन मेश्राम ,मधुकर ऊराडे,स्नेहदिप खोब्रागडे,रुपचंद निमगडे,डी.के.नागदेवते,लक्ष्मणन बागडे,खेमदेवजी गेडाम,शैलेद्र बारसागडे उपस्थित होते.