नागभीड च्या आठवडी बाजारात मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय..!!
-अनेकांचे महागडे मोबाइल केले लंपास..

अरुण भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – नागभीड ला दर गुरुवारी आठवडी बाजार भरत असतो.. या आठवडी बाजारात सध्या घडीला मोबाईल लंपास करणारी टोली सक्रिय आहे.. या टोळीने आतापर्यंत अनेकांचे महागडे मोबाईल लंपास केलेले आहेत.. हातसफाई अत्यंत चलाखीने मोबाईल वर हात साफ करीत ही टोळी वेगाने गायब होते.. गेले दोन तीन ते गुरुवार 10 ते 12 मोबाइल चोरीला जात आहेत… त्यामुळे नागरिकांनी आता बाजारात मोबाइल नेने बंद केले आहे.. गेल्या आठवडी बाजारात जि.प.सदस्य संजय गजपुरे हे काही कामा निमित्त बाजारात गेले असता चोरट्यांनी त्यांचाही आयफोन लंपास केला संजय गजपुरे यांनी लागलीच पोलीस स्टेशन ला तक्रार केली मात्र तो पर्यंत चोरटे पळून गेले होते..काही दिवसांपूर्वी नागभीड येथील बस स्थानकावरून बस मध्ये चढत असताना एका महिलेचा अडीच तोळे सोना चोरट्यांनी चोरला होता.. चोरीच्या वाढत्या घटना बघता नागभीड येथील नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी व या चोरट्यांचा जेरबंद करण्याची मागणी केली आहे..!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here