शहराच्या विकासाची दृष्टी असावी : गडकरी नपच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

46

शहराच्या विकासाची दृष्टी असावी : गडकरी
नपच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

शहराच्या विकासाची दृष्टी असावी : गडकरी नपच्या विविध विकासकामांचे लोकार्पण
शहराच्या विकासाची दृष्टी असावी : गडकरी
नपच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा २१/१०/२१
वर्धेत नव्याने बांधण्यात आलेल्या नगर पालिकेच्या जागेचे भूमिपूजन आपणच केले होते. उद्घाटनही आपल्याच हाताने व्हावे अशी नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा आग्रह होता. कोरोना काळात ते शक्य झाले नाही. नपची इमारत अतिशय देखणी झाली आहे. नपतर्फे करण्यात येत असलेल्या काही विकास कामांचे लोकार्पण झाले. शहराचा विकास करण्यासाठी तशी दृष्टी असावी लागते, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.
वर्धा नगरपरिषदद्बारे शहरातील विविध विकासकामांच्या ई-भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खा. दत्ता मेघे, खा. रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. पंकज भोयर, आ. डॉ. रामदास आंबटकर, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने, माजी खा. सुरेश वाघमारे, जिप अध्यक्ष सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, नगराध्यक्ष अतुल तराळे, आदींची उपस्थिती होती.
गडकरी पुढे म्हणाले, नगराध्यक्ष अतुल तराळे यांंनी धाम नदीवरून वर्धेला पाणी पुरवठा करण्यासाठी येत असलेल्या अडचणींसाठी आपल्याकडे पाठपुरावा केला. नपचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटला. असून आता 20 ते 25 वर्षे वर्धेत पाणी प्रश्‍न निर्माण होणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. धाम नदीचे रूंदी आणि खोलीकरण करण्यात आल्याने दोन ते अडीच हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार असल्याने जिल्ह्याचा विकास होणार आहे. शहरातील उड्डाण पुलाचे काम अर्थवट असल्याने मात्र त्यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यातून दररोज हजारो लोक रोज नागपुरात येतात. त्यांच्या सुविधेसाठी वातानुकुलीत मेेट्रो वर्धेपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.