स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे धर्मगुरु पहांदी पारी कुपार लिंगो जन्मोत्सव सोहळा संपन्न स्मार्ट गावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम : सर्व गावानी केला उत्सव. जन्मोत्सव सोहळयात सामाजिक कार्य करणारे व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.

44

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे धर्मगुरु पहांदी पारी कुपार लिंगो जन्मोत्सव सोहळा संपन्न

स्मार्ट गावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम : सर्व गावानी केला उत्सव.

जन्मोत्सव सोहळयात सामाजिक कार्य करणारे व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे धर्मगुरु पहांदी पारी कुपार लिंगो जन्मोत्सव सोहळा संपन्न स्मार्ट गावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम : सर्व गावानी केला उत्सव. जन्मोत्सव सोहळयात सामाजिक कार्य करणारे व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.
स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे धर्मगुरु पहांदी पारी कुपार लिंगो जन्मोत्सव सोहळा संपन्न
स्मार्ट गावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम : सर्व गावानी केला उत्सव.
जन्मोत्सव सोहळयात सामाजिक कार्य करणारे व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

मंगी (बु) ग्रामवासींकडून नागरी सत्कार – गजानन जुमनाके, जिवती, बाबुराव मडावी राजुरा, पांडूरंग जाधव जिवती, हरजु पा. सिडाम, तेलंगाना, विजय परचाके, गटशिक्षणाधिकारी राजुरा, अरुण पा. उदे, तालुका अध्यक्ष राजुरा, ममताजजी जाधव, तालुका अध्यक्ष जिवती, अब्दुल जमीर भाई, माजी पं.सं सदस्य, किसन पा. कोरांगे, कोरपना, राधाबाई आत्राम, राजुरा, रसिकाताई पेंदोर, मंगी (बु.), वासुदेव चापले, मंगी (बु), लिंगोराव सोयाम, शिक्षक जिवती, माजी सचिव मरापे यांचा शाल व श्रीफळ देवून मोठया थाटात सत्कार करण्यात आले

राजुरा,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी धर्मगुरु पहांदी पारी कुपार लिंगो जन्मोत्सव सोहळा मोठया थाटात साजरा करण्यात आला. गावातील सर्व समाजबांधवांनी रॅली काढली. गावातील कुमराम भिमू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर दिंडी धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो पेनठाणा येथे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
धर्मगुरु पहांदी पारी कुपार लिंगो जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गजानन जुमनाके हे होते तर उदघाटक म्हणून जिल्हाध्यक्ष बाबुराव मडावी हे होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय परचाके, मध्यवर्ती बँकेचे संचालक पांडूरंग जाधव, गोंडवाना महासभा अध्यक्ष हरजु पा. सिडाम, माजी जि.प. सदस्य भिमराव पुसाम, राजुरा तालुका अध्यक्ष अरुण पा. उदे, जिवती तालुका अध्यक्ष ममताजजी जाधव, उपाध्यक्ष प्रकाश वेडमे, माजी पं.सं सदस्य अब्दुल जमीर भाई, माजी नगरसेविका राधाबाई आत्राम, माजी सरपंच रसिकाताई पेंदोर, माजी उपसरपंच वासुदेव चापले, जिवती येथील शिक्षक लिंगोराव सोयाम, समाजसेवक किसन पा. कोरांगे, तेलंगाना येथील पदाधिकारी देवराव कोवा, केशवराव परचाकी, सुरु मास्टर, तेलंगराव आत्राम,आसिफाबाद, सुधाकर पेंदोर, विनोद आत्राम, संदिप तुमराम, नागेश कोरवता, बापुराव बोवनी, बळवंतराव कोरवता, गोंडी गायक रेला रवी मेश्राम, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, माजी सरपंच सोनबत्तीताई मडावी, ग्रामसेवक गजानन वंजारे, माजी ग्रामसेवक मरापे, गाव पाटील सोमाजी कोडापे, मोतीराम पा. पेंदोर यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. रात्रौला गोंडी गायक रेला रवी मेश्राम यांच्या गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला सर्व ग्रामस्थांनी व समाजबांधवांनी या गायनाचा लाभ घेतले. धर्मगुरु पहांदी पारी कुपार लिंगो जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे आयोजक ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम यांनी प्रास्ताविक केले. समाजाला एकत्र ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांनी केले तर आभार शंकर तोडासे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी गावातील गणपत कोडापे, रामभाउ तलांडे, शंकर कन्नाके, रामशाव कन्नाके, आनंदराव मडपती, ज्ञानेश्वर आडे, भाऊराव सिडाम, अरविंद कोडापे, बिरशाव परचाके, बापुराव सिडाम, प्रविण कोटनाके, मेंगेराव कोडापे, पंकज वेडमे, मारोती कन्नाके, जयपाल मडावी, वसंता सोयाम, बालाजी गेडाम, श्रीकृष्ण तोडासाम, शरद पुसाम, नितीन मरस्कोल्हे तथा समस्त सगाजन यांनी मोलाचे सहकार्य केले.