देवकुंड धबधब्यावर पर्यटकांकडून होते पैशाची लूट १४४ कलम पायदली.दिवसा दोन ते तीन लाखाचा धंदा,
जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक लक्ष घालून कार्यवाही करतील का ?…….
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा येथील देवकुंड परिसरातील गावाशेजारी असणाऱ्या धबधब्यावर जून ते ३० ऑक्टोबर २०२२ पर्यत १४४ हे कलम लागू असू देखील मुंबई, पुणे, तसेच महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून देवकुंड धबधबा पाहण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने पर्यटक येऊन धूमाकुल घालत आहेत. या धबधब्यावर पर्यटकां कडून प्रत्येकी २०० रूपये तसेच गाडी पार्किगचे १०० रूपये घेतले जातात तसेच दरोरोज एक ते दोन लाख रूपये धंदा होत या ठिकाणी होत असून शनिवार व रविवारी दोन ते तीन लाख या ठिकाणी धंदा हे काही तरूण व ग्रामस्थ अनाधिकृत पणे करीत आहेत अशी माहिती येथील काही गावचे ग्रामस्थ समाजसेव यांनी प्रसारमाध्यमानजवळ बोलताना सांगितली आहे. तसेच हे काही तरूण ग्रामस्थ पर्यटकाना फेसबुक तसेच इन्स्टाग्राम वरून पर्यटकांना आकर्षक करून बोलत असून त्यांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत.
देवकुंड धबधब्यावर जाण्याकरिता पर्यटकांना विळे,पाटणूस,भिरा पॉवर हाऊस मधून जावे लागते तसेच काही पर्यटक हे बेधुंद अवस्थेत मजा करण्यासाठी तरूण तरूणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेवून येत असतात तसेच भिरा पॉवर हाऊस मधून आपली वाहने थांबून येथेल काही तरूण व ग्रामस्थ त्याच्या कडून पैसे उकळून त्याच्या बँगाची व पर्यटकाची तपासणी करून त्यांना या जंगलात सोडत असतात.
तसेच यातील काही पर्यटक हे आपला जीव अक्षरशः मुठीत घेवून या जंगल परिसरातून जातात तर काही तरूण तरूणी या जंगल परिसरात झाडी झुडपातून फिरत असतात या झाडी झुडपात पर्यटका बारोबर कुठल्याही प्रकारे मोठा अनुचित प्रकार घडू शकतो तसेच हे पर्यटक गावातील रस्त्यावरून जात असताना वाहन चालवत असताना अश्लील गैरवर्तन करत जात असल्यामुळे ग्रामीण विभागतील शाळा काँलेजात जाणारे तरूण तरूणीनवर तसेच गावातील महिलां वर्गावर या पर्यटकानचा खूप त्रास होताना दिसत आहे. देवकुड धबधब्यावर जाण्याकरिता शासनाने मनाई आदेश जारी केला असून सुद्धा १४४ कलम हे भिरा पाटणूस येथील काही ग्रामस्थ तरूण मंडळी हा आदेश जून महिन्या पासून पायदली तुडवत आहेत.तसेच या भागातील कार्यारत असणारे पोलिस कर्मचारी देखील या प्रकारे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आसल्याचे कारण माञ गुळदस्त्यात दिसत आहे, धबधब्यावर जाण्यासाठी मध्येभागी एक नदीपाञ लागत असलेल्याने या धोकादायक नदी मधून हे पर्यटक धबधब्यावर जाण्यासाठी प्रवास करत असतात या मध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता देखील असून या पूर्वी देखील या धबधब्याने व नदीने काही पर्यटक व ग्रामस्थाचा बळी घेतला आहे. देवकुंड या ठिकाणी जाण्याचा मार्ग हा येऊन जाऊन १४ किलोमीटरचे अंतर आहे. देवकुंड धबधब्यावर डोंगर दारितून जीवघेणा प्रवास आहे. या प्रवासात कोण जखमी झाले तर त्याला येथी काही तरूण डोली मध्ये टाकून उचलून घेऊन येत असतात व पैसे घेतात.
तसेच देवकुंड या जिवघेण्या पर्यटन ठिकाणावर माणगांव पोलिस हे जाणी वपुर्वक लक्ष घालण्यास काना डोळा करत असून या जीव घेण्या धबधब्यावर ३० आँक्टोबर २०२२ पर्यत जरी बंदी असली तरी हा धबधबा फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालू राहाणार असून थंडीच्या महिन्यात तर या धबधबब्यावर पर्यटकाची होणारी मोठ्या प्रमाणात लूट व जीवाला होणारा धोका म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना शासनाने बंदी करून योग्य ती कारवाई करावी अशी देखील काही समाजसेवक तसेच पञकार व ग्रामस्थ यांची मागणी जोर धरत असून याकडे रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक रायगड यांनी लक्ष घालून देवकुंड धबधब्यावर काही तरूण व ग्रामस्थान कडून होत असलेली अनाधिकृत प्रकार लूट बंद करून देवकुंडवर कायम स्वरूपाची बंदी घालतीका असा प्रश्न पडला आहे.