बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या वतीने “पालक मेळावा- 2023” चे आयोजन
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर, 21 ऑक्टोंबर:महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, चंद्रपूरच्या सांस्कृतीक सभागृहात शनिवार, २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पालक मेळावा २०२३ चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला माता सरस्वती, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व प्रेरणास्त्रोत यशोधरा बजाज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधिवत सुरवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे व्हिजन वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारोहास सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा नील सी. बजाज, संस्थेच्या सचिव ममता बजाज, संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज, बजाज तंत्रनिकेतन चे प्राचार्य एस. ई. ठोंबरे, प्रा. विजय कोयाळ, प्रमुख पाहुणे व पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले प्रा. निलेश ढेकरे उपस्थित होते.
संस्थेचे प्राचार्य सतीश ठोंबरे यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाला सुरवात केली. त्यानंतर संस्थेत झालेल्या विविध स्पर्धेत भाग घेऊन प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेतर्फे घेण्यात
येणारे Techno-Minds, E-Newsletter अश्या आयोजनात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. विजय कोयाळ यांनी NBA चे महत्व व त्याचा होणारा संस्थेला व मुळातच विद्यार्थ्यांना होणारा लाभ याचे महत्व स्पष्ट करून पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे मुख्यकार्यपालन अधिकारी भरत बजाज यांनी आपल्या भाषणातून संस्था, विद्यार्थी आणि पालक यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या आणि त्यातून साधणारे यश यावर समयोचित मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी विचारलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. त्यानंतर पाल्यांच्या प्रगतीबाबत संबंधित प्राध्यापकांकडून माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेच्या सचिव ममता बजाज यांनी आपले
मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नील सी. बजाज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्था, विद्यार्थी आणि पालक उपस्थित असलेल्या आयोजनाला “त्रिकुट आयोजन” असे संबोधले कारण अश्या आयोजानामुळेच संस्था, विद्यार्थी आणि पालक यांचा ताळमेळ साधून सर्वांची उतरोत्तर प्रगती होत राहील असे मत व्यक्त केले. पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सिव्हील विभागाच्या प्रा. पिदुरकर मॅडम, सायन्स विभागाच्या प्रा. नगराळे व इलेक्ट्रीकॅल विभागाचे प्रा. मिटकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विविध विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी तसेच बहुसंख्येने पालक उपस्थित होते.