राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे नागपुरात आज ओबीसी युवांचे विचारमंथन 

अश्विन गोडबोले 

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 मो: 8830857351

नागपूर, 22 ऑक्टोंबर: ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ओबीसी युवकांचे विचार मंथन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या विदर्भ स्तरीय बैठकीचे आयोजन रविवार, 22 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वा धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेस नगर, नागपूर येथे करण्यात आले आहे.

या वेळी, बेरोजगारी, स्वयंरोजगार , आरक्षण व युवां समोरील भविष्यातील आव्हाने यावर विचार मंथन होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष. ऋषभ राऊत, नागपूर जिल्हा अध्यक्ष निलेश कोडे नागपूर, शहराध्यक्ष विनोद हजारे. नागपुर युवती अध्यक्ष श्रुतिका डाफ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here