वर्षावास प्रवचन मालिका मधील शेवटचे धम्मपुष्प “नव उद्योजकांसाठी शासकीय अर्थसहाय्य योजना” मार्गदर्शनसत्र संपन्न

52

वर्षावास प्रवचन मालिका मधील शेवटचे धम्मपुष्प “नव उद्योजकांसाठी शासकीय अर्थसहाय्य योजना” मार्गदर्शनसत्र संपन्न

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मो: ९८६९८६०५३०

 मुंबई- शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईच्या सायन कोळीवाडा मधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरातील त्रिरत्न बुध्द विहार येथे बौध्द समाज संघ यांच्या अधिपत्याखाली आणि बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या वर्षावास प्रवचन मालिका मधील शेवटचे धम्मपुष्प “नव उद्योजकासाठी शासकीय अर्थसहाय्य योजना” ह्या विषयावर आधारित शासकीय कृषि विभाग, ठाणे जिल्हा, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक अधिकारी, “आयु. रविंद्र अनंत तांबे सर” यांच्या प्रबोधनातून उस्फुर्त प्रतिसादाने संपन्न झाले.

ब-याच वेळा नव्याने उद्योग सुरु करताना व्यवहारासंदर्भातील अर्धवट ज्ञाना अभावी, आवश्यक कागदपत्रां अभावी, ब-याच प्रयत्न करूनही शासकीय योजनेतून कर्ज स्वरुपाचे अर्थसहाय्य न मिळाल्याने, जामिनदार म्हणून कोणीही विश्वासार्ह न मिळणे अशा नाना समस्या नव उद्योगकांसाठी येत असताना शेवटी उद्योजक क्षेत्रातून बाहेर पडतो, हि खंत सुरुवातीला युवा वर्ग आणि महिला सबलीकरण, सक्षमीकरण अभियान राबविणारे आम्रपाली सेवाभावी संस्था, मुंबई (रजि.) चे अध्यक्ष आयु. जितेंद्र स. कांबळे गुरुजी यांनी उपस्थित प्रवक्त्यांच्या नव उद्योजकांच्या समस्या मांडल्या तर भारत सरकारच्या “PMFME योजना” विषयी सविस्तर माहिती देत असताना “पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना” अंतर्गत उद्योग कसा निर्माण करावा ? आवश्यक यांत्रिक सामुग्री कुठून कशी मिळवावी? व्यावसायिक आर्थिक प्रकल्प अहवाल कसा तयार करावा? शासकीय ऑनलाईन अर्ज कसा भरता येईल ? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? आपला व्यवसाय कशा प्रकारे सादर करावा ? आणि तो वाढवण्यासाठी योजनेचा लाभ कसा घेता येईल ? याची विस्तृतरित्या शासकीय कृषी मुंबई आणि ठाणे जिल्हा समन्वयक अधिकारी

 आयु. रविंद्र तांबे सरांनी माहितीसत्रांतून मार्गदर्शन केले.

ह्या शिबिरामध्ये स्थानिक विभागीय सामाजिक संघटना प्रमुख आणि विशाखा धम्म जागृती महिला मंडळ, शालिमार तरूण मित्र मंडळ यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला होता. 

वर्षावास प्रवचन मालिका च्या माध्यमातून आदर्श व्यक्तिमत्व घडविणा-या बौध्द धम्माचा अभ्यास देताना वास्तविक धावत्या आधुनिक काळातील वाढत्या आर्थिक समस्यांवरील उपाययोजना संदर्भात जनमाणसांत प्रत्येक मनुष्याला सर्व बाजुने सक्षम करणारे उपक्रम राबविणे, हि काळाची गरज जाणून मुंबई आणि उपनगरच्या विविध वसाहतीतून असे शिबीर राबवून जन सामान्यांपर्यंत शासकीय योजना प्रत्यक्ष राबविण्याचा संकल्प घेऊन बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरूजी यांनी उपस्थितांना सुचना देत बौध्द समाज संघातर्फे मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून शिबीराचा समारोप झाला.