नवोदय स्पोर्टिंग क्लबद्वारे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर, 21 ऑक्टोंबर: महाराष्ट्र शासन क्रिडा विभाग तर्फे शैक्षणिक गुणांची सवलत मिळण्यासाठी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या परवानगीने चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटने व्दारे विविध गटामधील स्पर्धाचे आयोजन करून मुलांचे व मुलींचे निवड चाचणी व सामने स्पर्धा घेतल्या जातात.
या वर्षीच्या स्पर्धा दोन भागात विभागल्या आहेत. त्यात 18 व 21 वर्षे वयोगटातील स्पर्धा 29 ऑक्टोंबरला भद्रावती येथे नवोदय स्पोर्टीग क्लब व्दारे घेण्यात येईल 14 व 16 निवड चाचणी स्पर्धा व सामने तसेच वरिष्ठ महिला व पुरुषांच्या च्या स्पर्धा नंतर कळविल्या जाईल. जिल्हयातील खेळाडुनी आपली कागदपत्रे तयार करून स्पर्धेस यावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर चौकशी करावी. (9421717359 9421921629)