जिल्हाधिकारी यांनी घेतला पेण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी पेण विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पेण येथील स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.उपविभागीय अधिकारी पेण कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी पेण विधानसभा मतदार संघात निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार, पेण तहसीलदार तानाजी शेजाळ,उत्तम कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निवडणूकीमध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे श्री जावळे यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला.जिल्हाधिकारी श्री जावळे व पोलीस अधीक्षक घार्गे यांनी ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचा आढावा घेतला.