बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये व्हेलीडिक्टरी कार्यक्रम संपन्न
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 21 ऑक्टोंबर
बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे १४ ऑक्टो २०२४ पासून सुरु असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सहा दिवसीय FDP, AICTE ATAL अकादमी नवी दिल्ली द्वारा प्रायोजित “Artificial Intelligence and Machine Learning” या विषयावरील व्हेलीडिक्टरी कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. व्हेलीडिक्टरी कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्य समन्वयक प्रा. श्री. के. एस. झाडे यांनी सहा दिवशीय FDP कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर संस्थेचे प्राचार्य श्री. वि. एस. कोयाळ यांनी AICTE ATAL अकादमीचे संचालक डॉं. सुनील कुमार लूथरा यांचे विशेष आभार व्यक्त केले. त्यानंतर FDP ला उपस्तिथ अनेक प्राध्यापकांनी FEEDBACK च्या माध्यमातून आपापले मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने प्रा. येलने, प्रा. विशाली निम्ब्रते, प्रा. अजय कुमार पुना, प्रा. शीतल भालेराव, प्रा. आरती आरेवार, प्रा. योगेश देशमुख, प्रा. पूनम पवार यांचा समावेश होता.
उपस्थीत सर्व मान्यवरांचा परिचय करून दिल्यानंतर स्वागत करण्यात आले. डॉ. प्रगती पाटील उपप्राचार्या, तुलसीराम गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजि. अंड टेक्नोलोजी, नागपूर यांचा मोमेंटो आणि यशोगंधा पुस्तक प्रदान करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपापले FDP च्या संदर्भात अनुभव कथन केले.
त्यानंतर संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून FDP चे महत्व आणि त्याचा प्रत्यक्ष उपस्थितांना लाभ कसा घेता येईल यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर या कार्यक्रमाचे उपसमन्वयक प्रा. एस. एस. वाढई यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रियांका सिंग यांनी केले. कार्यक्रमाला राज्य व राज्याबाहेरून अनेक प्राध्यापकांनी आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.