एनएचएम कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात • तब्बल तीन महिन्यांपासून वेतन थकित

24

एनएचएम कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

• तब्बल तीन महिन्यांपासून वेतन थकीत 

एनएचएम कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

• तब्बल तीन महिन्यांपासून वेतन थकित

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर :
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यापासूनचे वेतन अद्याप थकित आहे. त्यामुळे दिवाळीसारख्या सणात वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाला आहे. यावर त्वरित तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, त्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या सलग तीन महिन्यांचा पगार थकित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना, या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मात्र काळोखात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. थकित तीन महिन्यांचे वेतन त्वरित न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ दिली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. आरोग्य यंत्रणा राबविण्यात या कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचेही आबिटकर यांनी म्हटले आहे. जूनच्या देय मानधनाच्या आधारे ही १५ टक्के वाढ दिली जाणार आहे. पण त्यांचे वेतन मात्र थकित आहे.