खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक विकासदादा गायकवाड यांचा असंख्य समर्थकांसह मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) गटात जाहीर पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का विकासदादा गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे गोरेगावची राजकीय समीकरणे बदलणार….!

26

खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक विकासदादा गायकवाड यांचा असंख्य समर्थकांसह मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) गटात जाहीर पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

विकासदादा गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे गोरेगावची राजकीय समीकरणे बदलणार….!

खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक विकासदादा गायकवाड यांचा असंख्य समर्थकांसह मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) गटात जाहीर पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

विकासदादा गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे गोरेगावची राजकीय समीकरणे बदलणार....!

विश्वास गायकवाड
बोरघर / माणगाव प्रतिनिधी
९८२२५८०२३२

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक,अत्यंत निकटवर्तीय माणगाव सह संपूर्ण गोरेगाव विभाग तमाम बहुजन समाजाचे आधारवड लोकप्रिय नेते,विकासदादा गायकवाड,यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जयमहाराष्ट्र करत शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते लोकप्रिय मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पक्षात दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक २० ऑक्टोंबर, २०२५ रोजी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह पक्षप्रवेश केला आहे.
गोरेगाव ची आण बाण आणि शान असलेले विकासपुरुष विकासदादा गायकवाड गोरेगाव बत्तिशी विभाग बौद्ध समाजाचे अध्यक्ष असून ते नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे या विद्यापीठातून सहायक कुलसचिव पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवेत असताना त्यांनी गोरेगाव परिसरातील बहुजन समाजातील गोरगरीब, सर्व सामान्य असंख्य लोकांची कामे केली आहेत. गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे जनतेची सामाजिक सेवा केल्याने ते जनतेच्या मनातील लोकप्रिय व्यक्तीमत्व आहेत.
विकासदादा गायकवाड यांना राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे, त्यांचे वडील दिवंगत शंकरराव गायकवाड हे गोरेगांवचे तत्कालीन सरपंच व जिल्हा परिषदेचे दोन वेळा सदस्य म्हणून जनतेतून निवडून आले होते. ते त्या काळात कुलाबा जिल्हा परिषदेचे सभापती होते. त्यांचे सुपुत्र विकासदादा गायकवाड हे गेली अनेक वर्षे गोरेगाव परिसरात कार्यरत असून गोरेगाव ग्रामपंचायतीवर त्याचे अनेकवर्ष वर्चस्व आहे. त्यांचा गोरेगाव जिल्हा परिषद मतदार संघात चांगला प्रभाव असून ते एक अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून सर्व परिचित आहेत.
विकासदादा गायकवाड यांचे सर्व जाती धर्मातील लोकांशी अत्यंत सलोख्याचे, मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे माणगाव आणि संपूर्ण गोरेगाव विभागात त्यांचा प्रचंड मोठा आणि दांडगा असा जनसंपर्क आहे.आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये गोरेगाव हा मतदार संघ अनुसूचित जाती करिता राखीव झाला आहे. या पार्श्वभुमीवर विकास दादा यांनी लोकप्रिय मंत्री भारतशेठ गोगावले यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असावा असे दिसते. मंत्री भारतशेठ गोगावले यांनी विकास गायकवाड यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, युवा सेना जिल्हा अध्यक्ष विपुल उभारे, तालुका अध्यक्ष ॲड. महेंद्र मानकर, जिल्हा महिला अध्यक्ष नीलिमा घोसाळकर, अरुणा वाघमारे, माजी सभापती महेंद्र, रवी टेंबे, दिनेश हरवंडकर, जगदीश दोशी, मंगेश कदम, वामन बेकर, पंढरी शेडगे, सुरेश यादव, रमेश यादव, यांच्या उपस्थितीत सर्व उपस्थितांचा पक्षप्रवेश झाला. या प्रसंगी विकासदादा गायकवाड यांच्या सोबत बत्तीस गावातील समाज मोठ्या संखेने हजर होता. त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रमणी साळवी, सदस्य, टेमपाले ग्रामपंचायत तसेच वडगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक महाडिक, सौ. राखी राजू मोरे, फालानी ग्रामपंचायत माजी सरपंच बळीराम मोरे, मंगरूळ ग्रामपंचायत सदस्या अपर्णा लोखंडे, लाखपाले ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, देवळी उपसरपंच विलास साळवी सोबत होते. नांदवी विभाग माजी तालुका अध्यक्ष यशपाल साळवी, सचिव मंगेश साळवी, खजिनदार महादेव पवार, सुरेंद्र जाधव, शशिकांत पवार उपस्थित होते. गोरेगाव विभागातील मुंबई अध्यक्ष संतोष साळवी, अँड. विलास लोखंडे, संतोष लोखंडे, मंगरूळ, राजेंद्र शिंदे, सुनील शिंदे, नामदेव शिंदे, विजय जाधव, पन्हळघर, निलेश महाडिक, राजू मोरे, कुरवडे, प्रकाश महाडिक, वडगांव, भूषण जाधव, सुरेश अहिरे, दिनेश तांबे, नागाव गावचे सर्व बबल हाटे, श्रीकांत हाटे. सुमारे २०० समज बांधवांनी लोकप्रिय मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या लोककल्याणकारी नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत गोरेगाव विभागातील राजकीय समीकरणे बदलणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.