महेंद्रशेठ घरत यांच्या`सुखकर्ता’ दिवाळी अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा पडला पार
‘लास्ट स्टॉप खांदा’ मराठी चित्रपटाच्या झालं जोरदार प्रमोशन
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल/उलवे: यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था,शेलघर व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी व महेंद्र घरत यांच्या विद्यमाने दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
उलवे करांनी श्रुषाव्य मैफिलीचा आस्वाद घेतला या कार्यक्रमात ‘इंडियन आयडॉल’ फेम सागर म्हात्रे, ‘होऊ दे धिंगाणा फेम’ विनल देशमुख, ‘सूर नवा ध्यास नवा’ तील श्वेता ठाकूर, तृप्ती दामले यांनी आपल्या सुरेल आवाजातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं.
याठिकाणी सर्वांना खळखळून हसवणारे हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकर, निखिल बने, जुईली टेमकर यांच्या आगामी चित्रपट ‘लास्ट स्टॉप खांदा’ याच प्रोमो प्रकाशित करत जोरदार प्रमोशन करण्यात आलं. “मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन प्रत्येकाने पाहिलं पाहिजे” असा आवाहनही घरत यांनी यावेळी केलं. राजकारणात निवडणुकीला उभा राहणार नसून, चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली. मानसरोवर यात्रे दरम्यान आलेले स्वानुभव त्यांनी दिवाळी अंक ‘सुखकर्ता’ च्या माध्यमातून वाचकांसमोर मांडल आहे.
शुभांगीताई घरत यांनी भेटवस्तू देवून पत्रकारांना दिवाळी शुभेछ्या दिल्या.