पनवेल आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आगीच तांडव… कामोठे मध्ये २ मृत्यूमुखी तर वाशी येथे ४ जण गंभीर जखमी.

69

पनवेल आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आगीच तांडव…

कामोठे मध्ये २ मृत्यूमुखी तर वाशी येथे ४ जण गंभीर जखमी.

पनवेल आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आगीच तांडव...

कामोठे मध्ये २ मृत्यूमुखी तर वाशी येथे ४ जण गंभीर जखमी.

पनवेल/प्रतिनिधी: दिवाळीच्या तोंडावर पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील जनरेटर मधील तांत्रिक बिघाड आग प्रकरणं ताजं असताना, कामोठे येतील सेक्टर ३६ येथील अंबे श्रद्धा वसाहती मधील ३ ऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ३०१ मध्ये पहाटे लागलेल्या आगीत शिरोडिया कुटुंबातील २ व्यक्ती रेखा शिसोडिया( आई ) आणि पायल शिसोडिया( मुलगी)मृत पावल्याच माहिती मिळाली. प्राथमिक माहितीतीत इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे स्वयंपाक घरात आग लागल्यच सांगण्यात येत आहे. स्वयंपाक घरात ३ सिलेंडर असल्याची माहिती समोरं आली आहे, त्यामुळे आगीच भडका उडाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर घटनास्थळी कळंबोली, पनवेल आणि न्यू पनवेल अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवून आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळला.
तसेच नवी मुंबईतील वाशी मधील सेक्टर १४ येथील एम जी कॉम्प्लेक्स मधील रहेजा रेसिडेन्सी मधील बी विंग मधील १९ व्या मजल्यावर रात्री दीडच्या सुमारास आग लागून याआगीत ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोरं आली आहे.
महानगरपालिका प्रशासन गृह निर्माण सोसायटी सेफ्टी ऑडिट करवून घेणार का?
की बघ्याची भूमिका घेणार असा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जातोय.