अर्हेर-नवरगाव रेतीघाट, दरोड्या साठी मोकाट “त्या” रेती तस्कराच्या ‘मास्टर माईंड” पुढे महसूल प्रशासनाचे लोटांगण

51

अर्हेर-नवरगाव रेतीघाट, दरोड्या साठी मोकाट

“त्या” रेती तस्कराच्या ‘मास्टर माईंड” पुढे महसूल प्रशासनाचे लोटांगण

अर्हेर-नवरगाव रेतीघाट, दरोड्या साठी मोकाट "त्या" रेती तस्कराच्या 'मास्टर माईंड" पुढे महसूल प्रशासनाचे लोटांगण
अर्हेर-नवरगाव रेतीघाट, दरोड्या साठी मोकाट
“त्या” रेती तस्कराच्या ‘मास्टर माईंड” पुढे महसूल प्रशासनाचे लोटांगण

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :-तालुक्यात रेती तस्करी साठी नंदनवन ठरलेल्या अर्हेर- नवरगाव रेती घाटातून ट्रॅक्टर वाटे होणाऱ्या एंट्री स्वरूपातील भुरट्या रेती चोरीला एका आदेशाच्या फर्मानाने थांबावत तालुका महसूल प्रशासनाने दाखवलेली चुणूक सर्वांच्या भुवया उंचावणारी होती मात्र त्या आदेशा नंतर काही तासातच भुरट्या रेती तस्करीचे रूपांतर मोठ्या दरोड्यात होऊन, रात्र पाळीला सहा चक्का, दहा चक्का, बारा चक्का हायवा एल पी वाहणाने सुरु असलेली अवैध रेती तस्करी बघता तो आदेश नुसता “कागदीघोडा” असल्याचे तालुक्यातील जनतेच्या लक्षात आले.

राजकीय, प्रशासकीय सहकार्य मिळवत व स्थानिक सर्राईत राजकीय दलालांना भागीदार बनवत तो मास्टर माईंड तस्कर, अधिकाऱ्यांचा अधिकार विकत घेत “दरोडा” घालत असल्याची नागरिकातून दबक्या आवाजात चर्चा होतं आहे

अर्हेर-नवरगाव नदीपात्राच्या रेतीची जिल्ह्याबाहेर मोठी मागणी व रेतीला वाजवीपेक्षा जास्त भाव असल्याने तालुक्यातील अर्हेर-नवरगाव रेती घाटावर अवैध रेती उत्खनन करून दामदुपटीने पैसा कमावण्यासाठी त्या मास्टर माईंड तस्कराने स्थानिक प्रशासन व राजकीय पाठबळ मिळवीला असून , गौण खनिजाचे रक्षक व सरकारी पगारावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच “कुंपणाने शेत खाल्ले” अशी अवस्था तालुक्यातील महसूल विभागा बाबत झाल्याने, अर्थपूर्ण व्यवहारातून महसूल प्रशासन झोपेचा सोंग घेत अक्षरशः लोटांगण घालत असल्याचे तालुक्यात नागरिकांना स्पष्ट निदर्शनास येत आहे.