दारुप्रेमी साठी खुशखबर: महाराष्ट्रात झाली आता दारू स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी घटवली.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक
📲 9766445348 📲
मुंबई:- दारु प्रेमी करिता महाराष्ट्र सरकारने एक खुशखबर दिली आहे. सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करत दारुची किंमत कमी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील मिळणा-या दारुची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने होणार. अगोदर एक्साईज ड्युटी जास्त असल्यामुळे देशात सर्वात महाग दारु महाराष्ट्रात मिळत होती ती कमी झाल्याने आता दारु प्रेमीना स्वस्तात दारु मिळनार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.,” अधिका-याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्यात. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल. सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे.
पण दारु बंदी जिल्हाच काय?
वर्धा जिल्हात संपुर्ण दारु बंदी असल्यामुळे दर वर्षी गावठी, बनावटी विषारी दारु अनेकाचे जीव घेत आहे. अनेक परिवार उघड्यावर येत आहे. दारु बंदीमुळे जिल्हातील दारु प्रेमीना महाग दारु घ्यावी लागत आहे. त्यांना कधी स्वस्ती दारु मिळेल हा प्रश्न वर्धा जिल्हातील दारु प्रेमी सरकारला विचारत आहे.