सिरोंचा तालुक्यात भाजीपाल्याचे दर वाढले
आर्थिक बोजा : सर्वसामान्य नागरिकांचे हाल

आर्थिक बोजा : सर्वसामान्य नागरिकांचे हाल
✒रवि एस. बारसागाडी़ ✒
9010477883
सिरोंचा तालुका प्रतिनिधी
सिरोंचा (वा) परतीच्या पावसाने धानपिकासह भाजीपाला पिकाचा मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे तालुक्यात भाजीपाल्याचे उत्पादन झाले नाही. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. स तालुक्यात भाजीपाल्याचे दर केव्हा स कमी होणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.
तालुक्यात खरीप हंगामात धानाचे नि उत्पादन घेतले जाते. त्यानंतर, रब्बी हंगामात भाजीपाल्याची लागवड शेतकरी करतात. धानाचे उत्पादन निघण्यापूर्वीच उपलब्ध जागेवर शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली होती. परंत परतीच्या पावसाने
भाजीपाला पीक सडले. त्यामुळे तालुक्यातील अंतर्गत आवक घटली. सध्या बाहेरच्या जिल्ह्यातून व तेलंगणा राज्यातून भाजीपाला येत आहे. हा भाजीपाला जवळपास दुप्पट किमतीत विकला जात आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारातील ही दरवाढ ४० टक्के असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय डिझेलचे दर ९३ रुपयांच्या वर प्रतिलीटर असल्याने भाजीपाला वाहतूकही महागली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे..