ब्रम्हपुरी मनसे तर्फे एस टी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात मुख्यमंत्र्यांना निवेदन व कर्मचाऱ्यांना मदत

राहुल भोयर ब्रम्हपुरी 9421815114
ब्रम्हपुरी: – एस टी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाउन घ्यावे या मागणी करीता सुरू असलेल्या एस टी कर्मचारी बांधवांची मागणी त्वरित मान्य करा या मागणीचे पत्र ब्रम्हपुरी मनसे तर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून आज दिनांक 21 ला ब्रम्हापुरीतील उपोषण मंडपाला भेट देऊन एस टी कर्मचारी बांधवांना जेवणाकरता मदत देण्यात आली.
महाराष्ट्र नवनि्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्य भर सुरू असलेल्या एस टी कर्मचारी बांधवांना समर्थन दिले आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज ब्रम्हपुरी मनसे तर्फे एस टी कर्मचारी बांधवांचे उपोषण मंडपाला भेट देण्यात आली.या भेटी दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात समर्थन करत ब्रम्हपुरी मनसे तर्फे ब्रम्हपुरी उपविभागिय अधिकारी यांचे मार्फत मान मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
मागच्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या संपामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे .एस टी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची अडचण लक्षात घेता ब्रम्हपुरी मनसे तर्फे तत्काळ गहू,तांदूळ,तेल व काही रक्कम रोख देऊन अल्पशी का होईना मदत करण्यात आली.या वेळी सुरज शेंडे तालुकाध्यक्ष , मंगेश फटींग, हरिष हटवार, नितीन पोहरे, तालुका उपाध्यक्ष, दिपक मेहर शहर अध्यक्ष, रविंद्र देवगडकर शहर उपाध्यक्ष व इतर कार्यकर्ते मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.