“मै मेरी बच्ची के लिये कुछ भी करुंगी” असं मनत वाघाशी लढणाऱ्या आईचा सत्कार
वाघाच्या जबड्यात 5 वर्षाच्या लेकीचं डोकं
जीवाची बाजी लावून लेकीची केली होती सुटका

वाघाच्या जबड्यात 5 वर्षाच्या लेकीचं डोकं
जीवाची बाजी लावून लेकीची केली होती सुटका
✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महिला आघाडी चंद्रपूर ग्रामीण यांचे वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राणी लक्ष्मीबाई “मै मेरी झाशी नही दूंगी ” असं मनत इंग्रजांशी लढल्या म्हणून आज जयंती निमित्ताने अशाच समाजात शूरवीर असणाऱ्या स्त्रीचा सत्कार करून समाजापुढे राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा ठेवणारी आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण चंद्रपूरमध्ये पाहण्यास मिळाले. शौचालयाला जात असताना वाघाने लेकीवर हल्ला केला. वाघाने चिमुरडीवर झडप घातली पण आईने मोठ्या हिंमतीने लढा देऊन आपल्या लेकराची सुटका केली आणि दोघींचा जीवा वाचवला. हि दि. १८ जुलै २०२१ ला घटना घडली.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या हल्ल्याचा घटना वारंवार घडत आहे. शहरालगत असलेल्या जुनोना गावाजवळ राहणाऱ्या अर्चना मेश्राम आपल्या पाच वर्षाची लेक प्राजक्तासह बाहेर शौचालयाला गेल्या होत्या. पण अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पाच वर्षाच्या प्राजक्तावर वाघाने झडप घातली. चिमुकलीचे डोके वाघाने आपल्या जबड्यात पकडले होते. अर्चनांनी सुरुवातीला आरडाओरडा केला. मात्र वाघ मुलीला सोडत नसल्याचे बघून बाजूची काठी घेऊन त्यांनी वाघावर हल्ला केला. पण मुलीला सोडून वाघाने अर्चना यांच्यावर हल्ला केला. मात्र मोठ्या हिंमतीने त्यांनी तो हल्ला परतून लावला. वाघ पुन्हा मुलीजवळ गेला. पुन्हा मुलीचे डोके जबड्यात पकडले. अर्चनाने “मै मेरी बच्ची के लिये कुछ भी करुंगी” असं मनत वाघाशी लढली. शेवटी अर्चना यांनी पूर्ण ताकदीनिशी वाघावर काठी घेऊन हल्ला केला. त्यांनतर वाघ घाबरून जंगलात निघून गेला.
या शुभदिनी लढवंय्या अर्चना मेश्राम यांचा” वाघीण आई” म्हणून सत्कार आमदार, लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे हस्ते करण्यात आले. शाल, श्रीफळ, शिल्ड, साडी चोळी, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचवार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, चंदनसिंह चंदेलजी, माजी आमदार संजय धोटे, जि. प. अध्यक्षा संध्या गुरनुले, महिला आघाडी उपाध्यक्ष प्रदेश वनिता कानडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, जि. प. सदस्य स्वाती वडपल्लीवर, पं. स. सदस्य भूमी पिपरे, महिला आघाडी महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता म्यॅकलवार, जिल्हा सचिव श्वेता वनकर, जिल्हा सचिव रजिया कुरेशी, वैशालोमल फरकडे, अश्विनी तोडासे, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.