कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट कुणबी युवा मंच लोणेरे गोरेगाव माणगांव तर्फे दुर्गे दुर्गेश्वर रायगड किल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता.प्रतीनिधी
8983248048
माणगाव : प्रत्येक गडावर येणाऱ्या सर्व पर्यटकांनी गडावर स्वच्छता राखून गडाचे पावित्र्य राखले पाहिजे, असे आवाहन कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक निलेश सत्वे यांनी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दुर्गे दुर्गेश्वर रायगड किल्यावर स्वच्छता मोहिमे प्रसंगी सांगितले. ” स्वच्छता हीच सेवा” या उपक्रमातंर्गत रायगड किल्ल्यावर आयोजित स्वच्छता अभियाना प्रसंगी ते बोलत होते. या अभियानाची सुरवात रायगड पायथा चित्त दरवाजा येथून झाली ती थेट टकमक टोक पर्यंत.
यावेळी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त निलेश तळवटकर, विश्वस्त प्रकाश मोरे, कुणबी युवा मंच तालुका माणगाव अध्यक्ष राम भोस्तेकर,
ट्रस्ट ग्रामीण अध्यक्ष संतोष खाडे, वरिष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम चिमण, नितीन कासरेकर , नरेश कालेकर, मदन आवाद, दर्शन कालेकर, करण पालकर, अशोक पालकर, नितीन शिंदे, सिध्देश मोरे, अथर्व गवसकर, तेज तळवटकर, दिलीप गवसकर, विद्देश चेरफले, केशव निंबरे, सागर गंभीर, संदिप ढेपे, शिवांग ढेपे, शिव ढेपे, जितेंद्र मोरे, जागृती मोरे, मधूकर मोरे, श्रुती आवाद, शितल आवाद , शुभम आवाद संतोष आवाद , महेश महादे, मंगेश वाळगुडे, सचिन पालकर, सुनिल पालकर, पंकज पालकर, किरण शिंदे, तुषार देवळेकर, मंगेश जाधव, अविनाश बटवले, शिरीष भोसले, निकेश सत्वे, समीर गवसकर यांनी मोहिमेत सहभाग घेतला होता.
निलेश सत्वे पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला हा किल्ला स्वच्छ आणि पवित्र राखणे आपले कर्तव्य आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या नजरेस पडेल तो कचरा गोळा करावा जेणेकरून किल्ला स्वच्छ राहील. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटक येथील स्वच्छतेचा आदर्श आपल्या सोबत घेऊन जातील. गडावर येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या सोबतच्या पाणी पिण्याच्या बाटल्या सोबतच घेऊन जाव्यात जेणेकरून कचरा होणार नाही. समोर दिसणारा कचरा कचरा कुंडीत टाकावा , प्लास्टिकचा वापर टाळावा इतराना ही याबाबत सूचित करावे, असे आवाहन संतोष खाडे यांनी केले. सदर मोहीम
कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व
कुणबी युवा मंच तालुका माणगाव
यांच्या संयुक्त विद्यमानाने यशस्वी करण्यात आली.
फोटो- कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दुर्गे दुर्गेश्वर रायगड किल्यावर स्वच्छता मोहीम राबविताना पदाधिकारी व सदस्य दिसत आहेत.