अवाढव्य रानगवा तलावात बुडाला
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 21 डिसेंबर
पाणी पिण्यासाठी घोडाझरी तलावावर आलेल्या रानगव्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता उघडकीस आली. हा रानगवा घोडाझरी तलावावर पाणी पिण्यासाठी आला. पाणी पिऊन झाल्यानंतर तो तलावात पोहायला लागला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खूप खोल पाण्यात गेला. काही वेळाने पाण्याच्या लहरीने वाहत वाहत तलावाच्या पाळीजवळ आला. सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान गस्तीवर असलेल्या वनरक्षकाची या रानगव्यावर नजर गेली. त्याने लगेच नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयास याबाबत माहिती दिली. या रानगव्याचे वय 15 ते 16 वर्षे असून तो 22 क्विंटल वजनाचा आहे, अशी माहिती वनविभागाचे सहायक वनरक्षक संजय हजारे यांनी दिली.