कुणबी समाजोन्नती संघ मुंबई २०२६ दिनदर्शिका प्रकाशन व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

28

प्राध्यापक सुरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पडणार पार;

समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे अध्यक्ष महेंद्र टिंगरे यांनी केलं आवाहन 

 संतोष उध्दरकर.

म्हसळा: कुणबी समाजोन्नती संघ शाखा मुंबई तालुका म्हसळा, मुंबई संलग्न महिला मंडळ, युवक मंडळ व क्रीडा मंडळ आयोजित दि. २१ डिसेंबर २०२५ वा रविवार रोजी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई २०२६ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीर तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा दि. २१ डिसेंबर २०२५ वार रविवार रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत बोरीवली पूर्व. मुंबई, श्रीकृष्ण सभागृहात आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्याला म्हसळा तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे सहसचिव श्री.अनिल काप यांनी आवाहन केले आहे.यावेळी विद्यार्थी करीअर मागदर्शन,अभ्यास पध्दती प्रभावी बनविणे, तणाव, परिक्षा दडपण कमी करणे, अभ्यासात एकाग्रता व नियोजन, विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घेणे, समुह चर्चा व प्रश्नोत्तर सत्र या प्रकारे तज्ञ म्हणून प्राध्यापक सुरज जाधव यांचे मार्गदशन मिळणार असुन विद्यार्थी यांना या शिबीराव्दारे कला, वाणिज्य, तंत्रज्ञान, स्पर्धा परिक्षा तसेच विविध क्षेत्रातील माहिती मिळुन करिअर बाबतीत योग्य दिशा मिळणार आहे असे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री.महेंद्र टिंगरे व सचिव श्री.राजू धाडवे यांनी सांगितले.