Home E-Paper मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रु.ग्रा.पंचायत गाणी कोंढे येथे महिलांसाठी ‘अगरबत्ती निर्मिती’ प्रशिक्षण...
ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा स्वयंरोजगार करून देणे, उपक्रमाचा मुख्य उद्देश
गावातील महिलांनी केवळ चूल आणि मूल यात मर्यादित न राहता कौशल्य आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे—सरपंच आदित्य कासुरंग
निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
8149679123
श्रीवर्धन : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी, कोंढे येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत महिलांसाठी विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना अगरबत्ती बनवणे’ या विषयावर सविस्तर तांत्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा स्वरोजगार उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षण मेळाव्याला ग्रुप ग्रामपंचायत गाणी कोंढे चे सरपंच . आदित्य कासरुंग, ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत माने, कृषी विस्ताराधिकारी राधा कराळे, उमेद (MSRLM) चे तालुका व्यवस्थापक किशोर गोरटे आणि तज्ज्ञ प्रशिक्षक शिल्पा पाटील, विप्राली पुसाळकर उपस्थित होते.
व्यावसायिक आणि तांत्रिक मार्गदर्शन:
प्रशिक्षक शिल्पा पाटील आणि विप्राली पुसाळकर यांनी महिलांना अगरबत्ती निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. केवळ अगरबत्ती बनवणेच नव्हे, तर त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळवायचा, सुगंधी द्रव्यांचे प्रमाण कसे असावे, आकर्षक पॅकिंग कसे करावे आणि तयार झालेला माल बाजारपेठेत कसा विकावा, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. घरच्या घरी कमी भांडवलात हा उद्योग सुरू करून महिला कशा प्रकारे आर्थिक उन्नती साधू शकतात, यावर यावेळी भर देण्यात आला.
मान्यवरांचे प्रतिपादन:
यावेळी बोलताना सरपंच आदित्य कासरुंग म्हणाले की, “गावातील महिलांनी केवळ चूल आणि मूल यात मर्यादित न राहता कौशल्य आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी ग्रामपंचायत सदैव प्रयत्नशील राहील.” तर कृषी विस्ताराधिकारी *राधा कराळे यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महिलांना केले.
या उपक्रमाला गाणी, कोंढे गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने चोख करण्यात आले होते. या उपक्रमामुळे गाणी, कोंढे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.