रांजणखार येथील दत्तात्रेय पाटील यांचे निधन

23

खारेपाठ विभागा मध्ये मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून होती ओळख

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील दत्तात्रेय गणू पाटील यांचे मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने एम जी एम कळंबोली येथे निधन झाले.

दत्तात्रेय पाटील हे मुंबई हकोबा एम्ब्रॉईडरी मध्ये कामाला होते. सेवा निवृत्ती नंतर सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते. त्यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे ते खारेपाठ विभागा मध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. तसेच ते रांजणखार ग्रामस्थ मंडळाचे बरेच वर्ष अध्यक्ष होते.सेवा निवृत्ती नंतर शेतकरी म्हणून आयुष्याची वाटचाल करत असताना वाचनाची व क्रिकेट पाहण्याचा छंद त्यांनी जोपासला होता. उत्कृष्ट वकृत्व असल्याने मित्रमंडळी ना एकत्र करून चर्चा करणे ,एकत्र वाचन करून त्यांनी वाचन संस्कृती जतन केली होती.

      रांजणखार गावाच्या नाक्यावर राहत असल्याने व नेहमी हसत खेळत व्यक्तिमत्व असल्याने अंगणामध्ये समवयस्क मित्र मंडळी सह बसलेले दिसायचे. असे दत्तात्रेय पाटील यांचे दिनांक १६ डिसेंबर २५ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी राहत्या घरी छातीत दुखू लागल्याने एम जी एम कळंबोली येथे दाखल करण्यात आले. अँजिओग्राफी केल्यानंतर मोठे ब्लॉकेज असल्याचे निदर्शनात आले.कार्डीओलॉजी वार्ड मध्ये ॲडमिट असताना पहाटे रक्तदाब वाढल्यामुळे हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भुवनेश्वर येथील वैकुंठ धाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

        यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुन,नातवंड असा खूप मोठा परिवार आहे.त्यांचे उत्तरकार्य २६ डिसेंबर२५ रोजी सकाळी ९:३० वाजता भुवनेश्वर येथे व होम हवन राहत्या घरी रांजणखार नाका येथे होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे.