शिवमोगा ट्रकमध्ये जिलेटीनचा महाभयंकर धमाका; 8 जणांचा मृत्यू.
जिलेटीनच्या स्फोटांचा धमाका एवढा मोठा होता की आसपासच्या भागातील अनेक घरांमध्ये याचा धक्का जाणवला. परिसरातील घरांच्या आणि दरवाजांच्या काचादेखील फुटल्या. या स्फोटात 8 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. आसपासच्या परिसतील लोकांना भूकंपाप्रमाणे धक्के जाणवल्याचं सांगितलं जातंय.
बंगळुरू :- कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यात अब्बालगेरे या गावात गुरूवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला. दगडखाणीजवळ एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या ट्रकमधून काही जण जिलेटीनच्या काड्या घेऊन जात होते. शिवाय स्फोटाची तिव्रताही मोठी होती. त्यामुळे आजू-बाजूच्या घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत. तर अनेकांना भूकंप झाला असं वाटलं त्यामुळे अनेक नागरिक आपल्या घरातून बाहेर निघाले.
.दरम्यान या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शिवमोगा हा गृह जिल्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा आहे. स्फोटकं ट्रकमध्ये होता की ट्रकच्या बाजुला याचा शोध अद्याप सुरू असल्याचं एडीजीपी यांनी म्हटलंय.