पुणे महाराष्ट्रातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल भीषण आग, पाच मजुरांचा होरपळून मृत्यू.

नीलम खरात
पुणे:- कोरोना लस बनवणार्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबद्दल महाराष्ट्रातील पुणे मधील मंजरी येथे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल 1 गेटला भीषण आग लागली. आगीची खबर मिळताच मदतकार्य सुरू झाले. या आगीवर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सीरम इन्स्टिट्युटमध्ये सहा मजली नवीन इमारतीचे काम सुरू असून याच इमारतीत आज दुपारी आगीचा भडका उडाला. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन जवानांनी केलेल्या पाहणीत शेवटच्या मजल्यावर पाच मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांची ओळख पटली असून हे सर्व जण कंत्राटी मजूर होते. साइटवर इलेक्ट्रिकल काम ते करत होते, असे स्पष्ट झाले आहे. रामाशंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघेही उत्तर प्रदेशातील), सुशीलकुमार पांडे (बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाष्टे (दोघेही पुण्यातील) अशी मृतांची नावे आहेत.
पुण्यातील महाराष्ट्रातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल 1 गेटला आग लागली. आग कशामुळे लागली अद्याप याची माहिती समोर आलेली नाही .कोरोना व्हॅक्सीन कोव्हिक्स सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनविली आहे. जी भारतासह इतर देशांना पुरविली जात आहे. त्याचवेळी अग्निशमन दलाची 10 वाहने आली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. आगीमुळे झाडाच्या वर धूर दिसला. आगीवर नियंत्रण मिळू शकले . मात्र, आगीमुळे किती लोक अडकले आहेत याची माहिती नाही.