Nagpur Central Jail only delivers drugs to police personnel
Nagpur Central Jail only delivers drugs to police personnel

नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोलिस कर्मचारीच पोहचवितात `ड्रग्स’

मंगेश मधुकर सोळंकी मध्यवर्ती कारागृह कर्मचाऱ्यांचे जेल अधीक्षकांना संशय आला अंगझडती झडती तपासणी केली असता ड्रग्स असल्याचे अधीक्षकांच्या लक्षात आले. त्याची धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मंगेशला धंतोली पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

नागपूर:- मध्यवर्ती कारागृहात एका जेल रक्षकाची अंगझडती घेताना त्याच्याकडे चक्क ड्रग्स आढळून आले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणी धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश मधुकर सोळंकी 28 रा. सहकारनगर असे आरोपी जेल कर्मचाऱ्यांचे नाव आहे. धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी कारागृहात घेण्यात आले. त्यांच्या वागणुकीवर जेल अधीक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांचा कसून झडती घेण्यात आली. त्यापैकी मंगेश सोळंकी हा झडती घेताना थरथरू लागला. त्याच्यावर जास्तच संशय बळावला. जेल अधीक्षकांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली. मंगेशच्या पायातील मोज्यात काहीतरी पुडी आढळून आली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ होता. त्याची तपासणी केली असता ड्रग्स असल्याचे अधीक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मंगेशची प्राथमिक चौकशी केली. तो समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यामुळे त्याची धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मंगेशला धंतोली पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here