मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार आरटीई अर्ज 9 फेब्रुवारी पासून प्रवेश भरता येणार.

प्रशांत जगताप

महाराष्ट्र:- राज्यतील विदर्भातील जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी  वर्धा, नागपुर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला जिल्हातील प्राथमिक विभागाची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील शाळा नोंदणीची प्रक्रिया गुरुवार दि. 21 पासून सुरू झाली असून आरटीई प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांना 30 जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. या प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी, शाळेचा प्रवेशस्तर आणि रिक्त जागांचा तपशील संबंधित गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक यांनी तपासून पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, विदर्भातील जिल्ह्यातील काही शाळांकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेतून बाहेर राहण्यासाठी विविध पळवाटा शोधल्या जात असल्याने अशा शाळांवर शाळांची मान्यता रद्द करण्यासारखी गंभीर कारवाई करण्याची ताकीदही शिक्षण विभागाने दिली आहे.

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. 9 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरता येणार असून त्यासाठी 26 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

यंदा प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी एकच सोडत काढण्यात येणार आहे. 5 मार्च रोजी ही सोडत काढली जाईल. तसेच सोडतीनंतर शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी काढली जाणार आहे. प्रतीक्षा यादी संपल्यानंतरही शाळेमध्ये जागा रिक्त राहिल्यास तसेच अर्ज शिल्लक असल्यास पुढे सोडत सुरू ठेवून विद्यार्थ्यांना शाळा अलॉट केली जाणार आहे.

असे असेल वेळापत्रक

शाळांची नोंदणी – 8 फेब्रुवारीपर्यंत

प्रवेशअर्ज भरणे – 9 ते 26 फेब्रुवारी

ऑनलाइन सोडत – 5 ते 6 मार्च प्रवेशनिश्चिती – 9 ते 26 मार्च

प्रतीक्षा यादी टप्पा 1 – 27 मार्च ते 6 एप्रिल, टप्पा 2 – 12 ते 19 एप्रिल, टप्पा 3 – 26 एप्रिल ते 3 मे, टप्पा 4 – 10 ते 15 मे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here