Shinganapur marital harassment, demand of Rs 9 lakh from Maher for taking a truck.

शिंगणापुर विवाहितेचा छळ,ट्रक घेण्यासाठी माहेरहून 9 लाखांची मागणी.

कोपरगाव:- तालुक्यातील शिंगणापुर येथे ट्रक घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिचा पती, सासू, सासरे, दीर जाऊ आणि नणंद , नणंदेचा नवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवनाथ बाळासाहेब कुऱ्हे नवरा, बाळासाहेब लक्ष्मण कुऱ्हे सासरे, ललीता बाळासाहेब कुऱ्हे सासु, वाल्मीक बाळासाहेब कुऱ्हे भाया, मालती जगदिश डांगळ, नणंद, जगदिश मांगु डांगळ,नणंद, रा. शिंगणापुर ता. कोपरगाव, शोभा महेंद्र नाटकर, ननंद, महेंद्र नाटकर, नणंद, रा, बालाजी नगर, कडोदरा, ता.जि. सुरत गुजरात, सतिष कानडे (ननंदई) रा. शिरसगाव लोकी ता. येवला, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 21 वर्षीय पूजा नवनाथ कुऱ्हे या विवाहितेने गुरुवारी 21 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मे 2017 ते सप्टेंबर 2020 कालावधीत घडला. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी महिलेला उपाशी ठेवले. तसेच ट्रक घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला तिला मारहाण, शिवागीळ, दमदाटी करुन तिला घराबाहेर काढुन दिले, असल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एम. दारकुंडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here