गोंडपिपरी काँग्रेसच्या मदतीला धावली शिवसेना,अपक्षांचाही पाठिंबा

51

गोंडपिपरी काँग्रेसच्या मदतीला धावली शिवसेना,अपक्षांचाही पाठिंबा

गोंडपिपरी काँग्रेसच्या मदतीला धावली शिवसेना,अपक्षांचाही पाठिंबा

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-सध्या स्थितीत गोंडपीपरि नगरपंचायत झालेल्या निवडणुकीत जनतेनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नसुन काँग्रेस ७ जागेवर,शिवसेना २भाजपा ४अपक्ष २,राष्ट्रवादी २असे सध्या स्थितीत पक्षीय बलाबल आहे.
कुणाचं गणित बिघडणार कुणाचं जुडणार या कडे तालुक्याचे लक्ष लागले असतानाच
काँग्रेस, शिवसेना,अपक्ष, निवडून आलेल्या उमेदवारासह , काँग्रेस,शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यांची संयुक्त गुप्त बैठलं पार पडली यात कॉंग्रेस,शिवसेना आणि अपक्ष मिळून गोंडपीपरी नगरपंचायतीत सत्ता स्थापन करणार असे ठरले.
दि २० जानेवारी सदर बैठक घेण्यात आली.त्यात आमदार सुभाष धोटे,नगराध्यक्ष अरुण धोटे,जी प माजी उपाध्यक्ष शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे,नवनियुक्त
नगरसेवक अनिल झाडे,यादव बांबोडे, सुनील संकुलवार,वनिता देवगडे,सारिका मडावी,रंजना रामगिरकार, सचिन चिंतावार,वनिता वाघाडे, सुरेश चिलनकर,शारदा गरपल्लीवार ,सविता कुळमेथे या 11 नगरसेवकांची उपस्थिती राजुरा येथील एका बैठकीत होती.त्या नंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे,राजुरा उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे,बाजारसमिती प्रमुख सुरेश चौधरी,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार,शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे,सरपंच देविदास सातपुते,संजय गांधी निराधार समितीचे विनोद नागापुरे,खेमचंद गरपल्लीवार,बालू फुकट,माजी नगरसेवक राकेश पुन,तालुका उपाध्यक्ष नितेश मेश्राम,शिवसेनेचे अशपाक कुरेशी, विवेक राणा,तुकाराम सातपुते,काँग्रेसचे अशोक रेचनकर,नितीन धानोरकर उपस्थित होते.सर्व उमेदवारांना घेऊन पक्षनेतृत्व त्यांच्या ग्रुपची प्रशासनामार्फत नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.हाच ग्रुप पुढील नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या बाजूने मतदान करेल असेही बोलल्या जात आहे यादरम्यान गटनेत्या म्हणून काँग्रेसच्या सविता कुळमेथे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दरम्यान ठरलेल्या बैठकीत गोंडपीपरी नगरपंचायत काँग्रेस, शिवसेना,अपक्ष मिळून सत्ता स्थापन होणार असे चित्र सध्या आहे.

बॉक्स

भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी आशावादी
भाजपला 4 जागेवर विजय मिळवता आला.बहुमत गाठायसाठी राष्ट्रवादी चे 2,अपक्ष 1,शिवसेना 2 एकत्र येऊन संमिश्र सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.शिवसेनेला नगराध्यक्ष पदाची ऑफर भाजपणे दिली आहे.

बॉक्स

काँग्रेस शिवसेना अपक्षांची झाली ग्रुप नोंदणी
२० जानेवारीला काँग्रेस ,शिवसेना,अपक्ष ऐकून 11 उमेदवारांची ग्रुप नोंदणी झाली.ही प्रक्रिया गुरवारी उशिरापर्यंत पार पडली