जैताणे गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

धुळे साक्री — जैताणे गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व नवीन ग्रामपालिकेच्या इमारत कार्यालयाचे भूमीपूजन मा.आमदार सौ.मंजुळाताई तुळशिराम गावीत यांच्या हस्ते संपन्न

जैताणे गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्नसंपन्न 

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
9623754549

आज दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी जैताणे ग्रामपालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीरामजी गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले तसेच जैताने गावांतर्गत स्थानिक आमदार विकास निधीतून वीस लक्ष रुपयांच्या भूमिगत काँक्रीट पाईप गटारीचे लोकार्पण देखील आमदार महोदयांच्या हस्ते झाले व जैताने गावातील एकलव्य वस्तीत नवीन बोरवेलचे उद्घाटन आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते झाले.

तसेच गावातील विविध विकास कामांना चे लोकार्पण आज रोजी करण्यात आले त्याप्रसंगी साक्री तालुका विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ मंजुळा ताई तुळशीरामजी गावित धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीरामजी गावित साक्री तालुका पंचायत समिती सदस्य सौ सोनाली बाजीराव पगारे जैताणे ग्रामपालिकेच्या सरपंच सौ कविताताई अशोक मुजगे,उपसरपंच सौ कविताताई राकेश शेवाळे,पं स मा सदस्य अशोक तात्या मूजगे, ग्रामपालिका सदस्य तथा गटनेते बाजीराव बुवाजी पगारे,दुसाने गणाचे प.स सदस्य श्री रविंद्र प्रतापराव खैरनार, वासखेडी गणाचे सदस्य श्री ईश्वर ठाकरे ,साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी बांधकाम विभागाचे प्रमुख रावसाहेब साबळे,जैताणे ग्रामपालिकेचे मा उपसरपंच नानाभाऊ पगारे,भगवान भलकारे,ईक्ष्वर पेंढारे ,पोपटराव न्याहाळदे,आन्ना न्याहाळदे,शिवसेनेचे नेते प्रकाश नाना पाटील,मा सरपंच संजय खैरनार, निजामपूर गणाचे माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे,शिवसेनेचे नेते भुपेशभाई शहा निजापुर गांवाचे युवा नेते यूसुफजी सैय्यद आदी मान्यवर उपस्थित होते

ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत वीस लक्ष रुपयांचा निधी नवीन ग्रामपालिका इमारत साठी वीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आज या कामाचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते झाले जैताणे गावातील ग्राम पालिकेची इमारत ही अतिशय जीर्ण व जुन्या काळातील होती म्हणून साक्री तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत निधी मिळवून देण्याचे काम आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी केले त्यात जैताणे गावाचा समावेश झाल्याने ग्रामस्थांनी आमदार महोदय यांचे अभिनंदन करताना आभार व्यक्त केले.

जैताणे गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

स्थानिक आमदार विकास निधीतून जैताने गावातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूमिगत गटार हा प्रश्न मार्गी लागण्यात मोठे सहकार्य आमदारांचे जैताणे गावाला मिळाले आदर्श विंद्या मंदिराच्या पाठीमागून ते अमरधाम पर्यंत एक गटार व बिरोबा महाराज मंदिरापासून,ग्रामपंचायत चौक,बाजारपेठ,साखर झिरा जैताणे पर्यंत दुसरी सर्वात मोठी काँक्रीट पाईप भूमिगत गटारीचे काम पूर्ण झाले त्या कामात साक्री तालुका विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी वीस लक्ष रुपयांचा निधी दिल्याने कामाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागला मोठी मदत मिळाली म्हणून आज त्यांच्या हस्ते या भूमिगत गटारीचे लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला.

जैताने गावात सुरू असलेल्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या 100 घराच्या वसाहतीला आज आमदार महोदयांनी व सर्व अधिकाऱ्यांची भेट देत कामाची पाहणी केली लाभार्थ्यांन सोबत चर्चा केली व चांगले काम झाल्याबद्दल ग्रामपालिकेचे कौतुक केले.

आखाडे रोड लागत एकलव्य वस्तीत नवीन बोरवेल चे उद्घाटन केले व आदिवासी वस्तीतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत मिळाली त्याबद्दल ग्राम पालिकेचे पदाधिकाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. रोजगार हमी योजने अंतर्गत जैताने गावासाठी लवकरच 50 लक्ष रुपयांचा निधी मिळवून गावांतर्गत रस्ते देण्याचे आश्वासन आज आमदार महोदयांनी सांगितले तसेच जैताने गावासाठी जीवनदायिनी असलेली बुराई पाणीपुरवठा योजना ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या महिनाभराच्या काळातच योजनेला मंजुरी मिळवून देण्यासाठी मा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याकडे आपण विनंती करणार असून लवकरच योजना गावात कार्यान्वित होईल अशी माहिती आज ग्रामस्थांना दिली तसेच नवीन पाणी शुद्धीकरण केंद्र फिल्टर पाणी दहा लक्ष रुपयाचे देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी जैताणे गावातील जेष्ठ पदाधिकारी पत्रकार,ग्रामस्थ व ग्रामपालिकेचे सदस्य श्री गणेश न्याहळदे,सौ तनुजा जाधव,सौ रमनताई चौधरी, लहुजी बोरसे, राजेश बागुल,सत्तार मणियार,गोकुळ पाटील, गोकुळ पगारे,शाम भलकारे,शांताराम मोरे,हिम्मत मोरे,समाधान महाले,ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे,कनिष्ठ लिपिक योगेश बोरसे,संगणक परिचालक प्रदीप भदाणे,अनिल बागूल आदी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here