मौजा मोडसर येथे श्री राम प्राणप्रतिष्ठा दिनाचा मंगलमय सोहळा संपन्न
, ✍🏻 राम राऊत मोहाडी तालुका प्रतिनिधी मो. नं.7517204987,
मोहाडी : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी रामभक्त प्रतिष्ठान संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने पार पाडण्यात आला. मांडेसर / रामपूर ग्रामस्थानी रामभक्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या समोर महाप्रसादीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . या महाप्रसादीचा आश्वाद घेण्याकरीता गावातील सर्व रामभक्त हिंदू सनातन धर्मातील महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमांचे आयोजक मंडळांनी पहाटे ४.३० वाजता संपूर्ण गावात ग्राम स्वच्छता अभियान राबविले . गावकऱ्यांनी आपआपल्या घरासमोर रांगोळी काढून संपूर्ण गाव दिप पेटउन प्रकाशमय केले .
या कार्यकमाचे प्रमुख आयोजक विनोद लिल्हारे, मनोज कुकवासे, पंकज नागपुरे, निलेश लिल्हारे, सचिन लिल्हारे, अमोल उपरिकर, अजय गोटेफोडे, अजाब गराडे, अजाबराव बावणे , भवन लिल्हारे , व गावातिल समस्त नागरिक, व संपुर्ण नव तरुण युवामित्र अपस्थित होते.
मांडेसर या गावामध्ये युवा मुलांनी पुढाकार घेवुन श्री राम प्राणप्रतिष्ठा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .
ह्यावेळी गावातिल जेष्ठ नागरिकांनी युवा मुलांना सहकार्यात मदत केली.
त्यामध्ये शाळेतील लहान मुला – मुलींनी प्रभु श्री रामाच्या नावाचा जय जयकार करून गजर केले. या कार्गक्रमात महिला मंडळीचा सहभाग हे खास .
महाप्रसाद चा क्रार्यक्रम पार पडल्यानंतर लगेच मांडेसर येथिल राणी अवंतीबाई स्मारकापासुन ते महात्मा ज्योतिबा फुले माळी मोहल्ला मांडेसर या ठिकाणा पर्यंत श्री रामच्या नगरीत प्रवेश केल्या सारखे रॅली काढण्यात आली होती .व भक्तिमय श्री राम यांच्या गाण्यांच्या गर्जनात गावात भक्तीमय वातावरण पसरवण्यात आला होता. त्यामध्ये महीला मंडळी व पुरुष मंडळी यांचा सहभाग होता.