इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई. चोवीस तासाच्या आत मोटरसायकल सह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

56
इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई. चोवीस तासाच्या आत मोटरसायकल सह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई.

चोवीस तासाच्या आत मोटरसायकल सह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई. चोवीस तासाच्या आत मोटरसायकल सह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी

इंदिरानगर पोलीस स्टेशन गु. र. नं. 19/2024 भा. द. वी. कलम 379 प्रमाणे दि.21/01/2024 रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात फिर्यादी राजू धनाजी पालवे यांची 40,000 रु. किमतीची पॅशन प्रो मोटरसायकल क्र MH 15 EU 1105 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. पोलिसांनी सदर घटनास्थळी भेट देऊन सी.सी.टीव्ही ची तपासणी केली असता फुटेज मिळून आले.
सदर आरोपी बाबत माहिती घेतली असता सदर आरोपी हा सातपूर परिसरातील असल्याचे समजले बातमीदारांकडून बातमी काढून आरोपी चेतन श्रीराम जंजाळ वय – 21 वर्ष, राहणार निर्माण वृंदावन गार्डन केदार नगर सातपूर नाशिक यास 24 तासाच्या आत चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आहे. पुढील तपास पो.ना सागर परदेशीं करीत आहेत.
सदरची कामगिरी वपोनि अशोक शेरमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी सूर्यकांत सोनवणे, पोना सागर परदेशी, पोशि मुशरीफ शेख, पोशि योगेश जाधव, पोशि चंद्रभान पाटील, यांनी केली आहे.