नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत पीयुष देवगडे अव्वल

65
नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत पीयुष देवगडे अव्वल

नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत पीयुष देवगडे अव्वल

नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत पीयुष देवगडे अव्वल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

मूल : 22 जानेवारी
तालुकास्तरीय नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा सन २०२३- २४ पं. स.मुल; चंद्रपूर अंतर्गत शुक्रवारी, १९ जानेवारी रोजी जी. प. उच्च प्राथ. शाळा बोरचांदली येथे आयोजित केलेल्या वादविवाद स्पर्धेत प्राथमिक गटातून पीयुष सूरज देवगडे याने घवघवीत यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला. पीयुष हा जी. प. उच्च प्राथ. शाळा डोंगरगांव येथील इयत्ता तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी आहे आणि यापूर्वी तो केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या याच स्पर्धेत प्रथम आला होता..पीयुष ला लहानपणापासूनच वाचन, लेखन, इतर कला गुणांची व अभ्यासाची आवड आहे. मुल तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असल्यामुळे पीयुष देवगडे ची आता नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेकरीता जिल्हा स्तरावर निवड झाली हे विशेष.
पीयुषने यश संपादन करत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व आई वडील यांना यशाचे श्रेय दिले आहे. पियुशच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे..