सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात प्रारंभ

36

सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात प्रारंभ

सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात प्रारंभ

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 22 जानेवारी
येथील सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा प्रारंभ होवून थाटात उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. काटकर हे होते.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बन्सोड, विज्ञान विभागप्रमुख डॉ. विजय वाढई, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. राहुल सावलीकर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अजय बेले आदी उपस्थित होते.
डॉ. काटकर यांनी, खेळाडूंनी खेळाप्रती समर्पित असावे. सर्व विद्यार्थ्यांनी सांघिक भावनेने, खिलाडू वृत्तीने या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे सांगितले. डॉ. माधमशेट्टीवार यांनी, आपल्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अश्या स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे नमूद केले. संचालन डॉ. कुलदीप गोंड, तर आभार प्रदर्शन डॉ. अजय बेले यांनी केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी महोत्सवाबद्दल शुभेच्छा दिल्या.