पाकिस्तान क्रिकेटरने सामना चालू असताना भर मैदानात केली खेळाडूला मारहाण

49
पाकिस्तान क्रिकेटरने सामना चालू असताना भर मैदानात केली खेळाडूला मारहाण

सिद्धांत
२२ फेब्रुवारी, मुंबई: पाकिस्तनामध्ये सध्या देशांतर्गत टी-२० सामान्यांची पाकिस्तान सुपर लीग चालू आहे. या स्पर्धेदरम्यान लाहोर आणि पेशावर या दोन संघांमध्ये चाललेल्या सामन्यांमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

लाहोर संघाकडून खेळणाऱ्या हरिस रौफ या गोलंदाजाने आपल्याच संघातील कामरान घुलाम या खेळाडूस भर मैदानात मारहाण केली. पेशावर संघाच्या फलंदाजांचा विकेट घेतल्यानंतर जोशामध्ये सेलीब्रेशन करत असताना, हरिस रौफने कामरान घुलामच्या कानाखाली मारली.

https://youtu.be/0WXMzKVw7VY

खरतर हरिस रौफ आणि कामरान घुलाम हे चांगले मित्र आहेत. हि घटना घडल्यानंतर कामरान घुलामने मैदानावर काहीही प्रतिक्रिया दाखवली नाही. परंतु पाकिस्तानी क्रिकेट फॅन आणि जगभरातील क्रिकेट चाहते मात्र हरिस रौफच्या कृत्यावर टीका करत आहेत. तुम्हाला काय वाटते? नक्की कळवा.