१ कोटी रूपयाच्या विकास निधीतून होणार भारोसा गट ग्रामपंचायतचा कायापालट
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
भारोसा – दि.२० फेबु. वर्धा-पैनगंगा-निर्गुना पवित्र नदिंच्या त्रिवेणी संगमावर दक्षिण दिशेला वसलेल्या प्राचिन हेमाडपंथी हनुमान मंदिर तामसी रीठ(भारोसा) या पावन स्थळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नातून भारोसा गट ग्रामपंचायतीला विविध योजनेतून मंजूर निधी १ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमीपूजन सोहळा पार पडला.
यामध्ये २५१५ लेखाशिर्ष अंतर्गत सिंमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी १५ लाख रुपये,स्मशानभूमी शेड बांधकामासाठी ५ लाख रूपये, तामसी रीठ हणुमान मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी ४ लाख रुपये,भारोसा येथिल आर.ओ.प्लॅंटसाठी १५,७५,५९७ लाख रुपये,एकोडी येथे वर्गखोली बांधकामासाठी १२ लाख रुपये, विजरोधक सयंत्र ४ लाख, भारोसा फाटा येथे बस स्टॅंडसाठी ४ लाख ५० हजार रुपये, महिला बचत गट इमारत बांधकामासाठी ९,११,५५४ रुपये, ओपण जिम साहित्य ७ लाख रुपये,माॅड्ल स्कुलसाठी ९३,००० रुपये,पाण्याची टाकी बांधकाम ५,४२,५८३ रुपये,ईरइ येथिल आर.ओ.प्लंटसाठी ५,४२,५८३ रुपये,भारोसा गावातील बंदिस्त नाली बांधकामासाठी ६,८९,००० रुपये,जि.प.शाळा भारोसा दूरूस्तीसाठी १,४६,४३२ रूपये,एकोडी शाळा दुरुस्ती ४८११६ रुपये, कचरा कुंडी आणि बसण्यासाठी सिमेंट बेंच २,४०,५७८ रुपये,फागिंग मशीनसाठी १लाख रुपये,जि.प.शाळा भारोसा एकोडी,इरई येथे थंड पाण्याचे जलशुद्धिकरण यंत्र १,४४,३४८रुपये,भारोसा येथिल राष्ट्रिय शहिद बाबुराव शेडमाके स्मारक सौंदर्यीकरण २लाख रुपये अशा एकुण १ कोटी ३ लाख ५७ हजार रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून कोरपना प.स.च्या सभापती रुपाली तोडासे,प्रमुख पाहुणे प.स.उपसभापती सिंधुताई आस्वले,जि.प.सदस्या विनाताई मालेकर,जि.प.सदस्या कल्पनाताई पेचे,पं.स.सदस्य संभाजी कोवे,सं.गां.नि.यो.कोरपना अध्यक्ष उमेश राजुरकर,बाजार समिती कोरपनाचे उपसभापती योगेश गोखरे, माजी जि.प.सदस्य उत्तम पेचे,कांग्रसचे जेष्ठ नेते सुरेश मालेकर,बंडू चौधरी,अशोक माशिरकर, सुभाष चौधरी,देवराव ठावरी,किसन डोंगे,भोयगांवच्या सरपंच शालु बोंडे,मुरलीधर बल्की तसेच गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एकनाथ गोखरे यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवराव पावडे,राजू धोंगळे,सतिष ढवस,भास्कर कुंभे,भगवान धोंगडे,दिलिप सुर्तेकर,प्रफुल रोगे,निलेश गेडाम,रामचंद्र गोखरे,अनिल गेडाम, सचिन किन्नाके,नारायण ढवस,तसेच जय हनुमान पदावली मंडळाचे,महिला बचत गट सदस्या,शहिदबाबुराव शेडमाके स्मारक समिती,ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.