लॉर्ड बेडन पावेल यांची जयंती साजरी
*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*
– आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन, चिंतन व विश्वबंधुत्व दिवस उत्साहात साजरा.
– महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड तृतीय सोपान चा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरण.
राजुरा: – बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे लॉर्ड बेडन पावेल यांची जयंती आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन, चिंतन दिन व विश्वबंधुत्व दिवस म्हणून सुद्धा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय हरित सेना प्रमुख तथा स्काऊट लीडर बादल बेले, छ. शिवाजी महाराज स्काऊट युनिट लीडर रुपेश चिडे, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम लॉर्ड बेडन पावेल व लेडी बेडन पावेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड तृतीय सोपान चा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल स्काऊट व गाईड च्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. विध्यार्थीनि ही आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक जांभुळकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. भारतीय मुलांना उत्तम नागरिक बनवत त्यांच्यामध्ये सेवाभाव रुजविण्याच्या हेतूने लॉर्ड बेडन पावेल यांनी भारत स्काऊट आणि गाईड ची निर्मिती केली कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, सुचिता हे सूत्र असणारी बालवीर चळवळ 1907 मध्ये त्यांनी सुरू केली. सदर चळवळ सार्या जगभर पसरलेली आहे. स्काऊट गाईड चळवळ भावी युवक वर्गांसाठी प्रेरणादायी आहे. स्काऊट गाईड नैसर्गिक आपत्ती आल्यावर मदतीला धावून जात असते, सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असते, निसर्गाचे रक्षण व संवर्धन करते, अंधश्रद्धा, प्रदूषण यावर आधारित कृतीयुक्त कार्यक्रम घेत असते. मानवाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे काम स्काऊट गाईडच्या माध्यमातून होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिजामाता गाईड युनिटच्या लीडर सुनीता कोरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कब -बुलबूल युनिट लीडर वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, रोशनी कांबळे, स्काऊट व गाईड युनिट च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले.