बारावी पास व एक वर्ष अनुभव असणाऱ्यांनी वैदयकीय उपकरणे विकायची मग फार्मासिस्टने चकना आणि वाईन विकायची का….?
फार्मासिस्ट नितीन सेलकर
केंद्र सरकारने घेतलेल्या प्रस्तावाचा फेरविचार करावा…..!
अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
महाराष्ट् :- राज्याचा विचार करता महाराष्ट्रात अंदाचे साडेतीन ते चार लाख नोंदणीकृत फार्मासिस्ट आहे,त्यापैकी जवळपास अंदाजे एक लाख मेडिकलची संख्या आहे,आकडेवारी बघता बहुतांश फार्मासिस्ट आधीच बेरोजगार आहे, अशात फार्मासिस्टला नौकरी उपलब्ध करून देण्याऐवजी फार्मसी क्षेत्रात बारावि पास व एक वर्ष अनुभव असणाऱ्याना सुद्धा छत्तीस प्रकारची औषधी उपकरणे विकण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार घेत असेल तर फार्मासिस्टने मेडिकल स्टोअर्स उघडून वाईन आणि चकना विकायचा का…?असा प्रश्न या निमित्ताने उपस्तीत होते आहे.
*औषधी उपकरणे विकण्याचा प्रस्ताव आलेला आहे,औषधी विकण्याचा नाही…..!*
केंद्र सरकारने घेतलेला प्रस्ताव हा छत्तीस प्रकारची औषधी उपकरणे विकण्याचा आहेत मात्र काही पत्रकारांनी टी.आर.पी. वाढविण्यासाठि औषधी दुकान टाकता येणार असल्याच्या चुकीच्या आणि खोट्या बातम्या बऱ्याच माध्यमानि प्रसारित केल्या आहे,सदर प्रस्ताव हा औषधी उपकरणे विकण्या संदर्भात आहे त्यामुळे फार्मासिस्टने गोंधळून जाऊ नये.
*देशातील फार्मासिस्टने आक्षेप नोंदवावा….*
२४ मार्च पर्यंत देशातील व राज्यातील फार्मासिस्टने केंद्र सरकारच्या चुकीच्या प्रस्तावाला drugsdiv-mohfw@gov.in या मेल च्या माध्यमातून विरोध नोंदवावा अन्यथा पुढील संकटाला पुढे जावे लागेल,पुढील पिढी मात्र आम्हाला सदर चुकीचा प्रस्ताव लागु झाल्यास माफ करू शकणार नाही.
*ओटीसी प्रोडक्टमुळे मेडिकलचे आधीच महत्व झाले कमी…*
डेटॉल,सॅवलोन,बाम,आधी वस्तू मेडिकल मध्ये विकण्याऐवजी चौकातील प्रत्येक किराणा,पानठेला टपरीवर मिळत असल्याने मेडिकलचे महत्व कमी होताना दिसते आहे, अशातच आणखी काही मेडिकल क्षेत्राशी घेतलेले निर्णय फार्मासिस्टला रस्त्यावर आणल्या शिवाय सोडनार नाही…
*प्रस्ताव लागू झालाच तर…!*
सदर प्रस्ताव लागू झालाच तर कोणीही बारावी पास अनुभवी व्यक्ती वैद्यकीय उपकरणे विकण्याच्या दृष्टीने मोठमोठी दुकाने थाटतील व हळूहळू सरकार आणि प्रशासनाच्या डोळयांत धूळफेक करून औषधीही विकण्याला सुरुवात करून आपल्या हक्काच्या फार्मसी क्षेत्रात आपले महत्व कमी करतील…
*फार्मासिस्ट नितीन सेलकर यांची प्रतिक्रीया:*
केंद्राने इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्या नंतर एक वर्ष अनुभव असणाऱ्याना छत्तीस प्रकारची औषधी उपकरने विकण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या प्रस्तावावर फेर विचार करावा,तसेच देशातील व राज्यातील सर्व फार्मसी विद्यार्थी,मेडिकल, व्होलेसलेर,औद्योगिक, शिक्षण,मैडीकल रिप्रेझेटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या फार्मासिस्टने २४ मार्च पर्यंत आपला मेल द्वारे आक्षेप नोंदवावा असे आवाहन मी सर्व फार्मासिस्टला करतो आहे. अन्यथा गडद संकटाला समोर जावे लागेल…