
सिद्धांत
२२ फेब्रुवारी, मुंबई: उत्तर प्रदेशातील निवडणुकीदरम्यान सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी जोरदार प्रचार करत आहेत. गेले कित्येक दिवसांपासून प्रियांका गांधी यांनी प्रचारासाठी उत्तर प्रदेशमधील अनेक रॅलींमध्ये सहभाग घेतला आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत. पण प्रचाराच्या गोंधळात स्थानिक पातळीवर पक्षांमधील आरोप, हेवेदावे कधीकधी नाहीसे होत असल्याचे दिसून येत आहे. अशाच एक घटनेचा विडिओ समोर आलेला आहे.
https://youtu.be/zbPICg5ySKw
प्रियांका गांधी उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना प्रवास करताना विरोधी पक्ष भाजपच्या कार्यकर्त्यांच्या रॅलीच्या शेजारून त्यांची गाडी जात होती. भाजपच्या प्रचारकर्त्यांना या गोष्टीची खबर लागताच त्यांनी प्रियांका गांधींच्या गाडीभोवती गराडा घातला. त्यानंतर प्रियांका गांधींनीही त्यांच्याशी बातचीत केली. काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटप केले. महिला प्रचारकर्त्यांना त्यांनी दिलेल्या ” लड़की हू, लड सकती हू” ह्या घोषणेचे हातातले बॅण्डचे वाटप केले. इतकेच काय तर जमलेल्या गर्दीमधील व्यक्तींशीआदराने बोलत हस्तांदोलन करण्यासाठीही आपला वेळ दिला. प्रियांका गांधींच्या या कृतींबद्दल तुम्हाला काय वाटते? नक्की कळवा?