माणगांव तालुक्यातील म्हसेवाडी येथे एका वृद्ध महिलेचा खून करून दागिने लंपास 

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो:8080092301

 रायगड :-माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथे एका वृध्द महिलेचा खून करून तीन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना दि.21 फेब्रुवारी रोजी घडली आहे. श्रीमती.संगीता श्रीरंग सावंत वय वर्ष 69 रा. म्हसेवाडी पो. पाठणूस ता. माणगांव असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही महिला महाशिवरात्री उत्सवानिमित्त मुंबईतून गावी आली होती. घरी दुसरे कुणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये तीचे तोंड बुडवून तिची हत्या केली आणि कानातील कानशील सोन्याचे कुडी हाताने जबरदस्तीने खेचून रक्तब्बबाळ केले व गळ्यातील सोन्याचे माल जबरदस्तीने तोडून व हातातील सोन्याचे चार बांगड्या चोरी करून पसार झाले .

या प्रकरणाची खबर माणगाव पोलिस ठाण्यात कळताच माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सह पोलीस निरीक्षक मोहिते, सह पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील मॅडम घटनास्थळी पोचले व या घटनेची तक्रार माणगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असुन,संशयित आरोपी सुभाष दळवी वय वर्ष 50, प्रशांत कदम वय वर्ष 55, व राजेश सावंत वय वर्ष 58 सर्व राहणार म्हसेवाडी ता. माणगांव जि रायगड यांच्या विरोधात कॉ. गु. रजि. नं 53/2023 भा. द. वि. स. कलम 302,394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून उप विभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी सॊ. रोहा विभाग अति. चार्ज माणगांव विभाग, माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास सह पोलीस निरीक्षक मोहिते, सह पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील मॅडम, पो. ना. खिरीट हे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here