एन. जे. पटेल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप 

मनोज एल खोब्रागडे

सह संपादक मीडिया वार्ता न्युज

मोबाईल नंबर : 9860020016

गोंदिया : – गोंदिया शिक्षण संस्थे द्वारा संचालित एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी च्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबीराचा समारोप सरपंच मा. श्री जागेश्वरजी मेश्राम यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ. जे. एम. पांडे अध्यक्षतेखाली थाटात पार पडला.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. पांडे यांच्या मार्गदर्शनात ग्राम कान्हळगाव येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास’ या संकल्पनेसह आयोजित सात दिवसीय विशेष निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी सरपंच श्री जागेश्वरजी मेश्राम यांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेशकुमार भैसारे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल चवळे, व डॉ. डाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात केलेले श्रमदन, पथनाट्य, पुतळ्यांची केलेली सफाई, प्रबोधन पर बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे प्रभावित होऊन पुन्हा शिबीर आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मंचावर उपसरपंच सौ. कांचन ताई निंबार्ते, श्री केशवराव बांते, श्री शिवशंकरजी सव्वालाखे, सौ. अर्चना ताई शेंडे, श्री शेखरजी कस्तूरे, श्री वसंतजी कस्तूरे, श्री जयलालजी माहुले, श्री मुन्नाजी निंबार्ते, डॉ. सुरेन्द्र पवार, डॉ. प्रमोद वरकड़े, प्रा. संतोष जाधव, श्री उमरावजी उपरकर, श्री विलास किटे, विद्यार्थी प्रतिनिधी मोहन नंदनवार, विद्यार्थिनी प्रतिनिधी पायल झेलकर आदि मान्यवर उपस्थित होते.  

 कार्यक्रम अधिकारी प्रा. महेशकुमार भैसारे यांनी आपल्या अहवाल वाचनातून शिबिराच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी राबविलेल्या विविध बौद्धिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. ग्रामवासीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच गावच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. संचालन प्राची रंभाड़ तर आभार प्रदर्शन डॉ. चवळे सर यांनी केले. अशा रीतीने गावातील पहिल्याच रासेयो शिबिराची सांगता ग्रामस्थ आणि शिबिरार्थी यांच्या उपस्थितित झाली. 

 यापूर्वी शिबिराचे उद्घाटन सरपंच साहेब यांच्या हस्ते पार पडून शिबिराच्या उपक्रमांना सुरुवात झाली. शिबीर उभारणी नंतर शिबीर परिसराची स्वच्छता करण्यात येवून विद्यार्थ्यांचे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय व क्रांती असे गट पाडण्यात येवून त्यांना दैनंदिन कामाचे नियोजन करण्यात आले. शिबिरार्थी स्वयंसेवकाद्वारे ग्रामसफाई, पथनाट्य, जनसंपर्क, ग्राम सर्वेक्षण, खेळ, प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्र, गट चर्चा इ. दैनंदिन कार्यक्रमांद्वारे उद्दीष्टपूर्ती करण्यात आली.     

 दुपारच्या प्रबोधन सत्रात ‘संविधान जागर’ या विषयावर तर ‘नवमतदार जनजागृति व नोंदणी’ या विषयावर नायब तहसीलदार श्री व्ही. डी. बोरकर यानी मार्गदर्शन केले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोण’ या विषयावर श्री. ग्यानचंदजी जांभूळकर सर, भंडारा यांनी विविध प्रयोग करून ढोंगी बाबा, बुवाबाजी करणार्‍यांचा भंडाफोड केला व गावकरी, महिला वर्ग यांनी अशा अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामीण रुग्णालय, मोहाडी च्या वैद्यकीय टीमद्वारे ‘रोगनिदान व उपचार’ शिबीर आयोजित करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एन. खुणे, कु. माधुरी नरड़, कु. माधुरी आंबिलडुके यांच्या टीम ने रक्तगट तपासणी, बी.पी. शुगर, जनरल चेकअप व औषधोपचार अशा शिबिराचे आयोजन केले. या आयोजनाचा लाभ गावातील बहुसंख्य ग्रामस्थ आणि शिबिरार्थीनी घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजना सोबतच देशभक्ती, थोर पुरुष, महिला अत्याचार, शेतकर्‍याची दैना, दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, भारतीय संस्कृति, विविध सामाजिक समस्या अशा विविध विषयांवर संदेश व जागृती करण्यात आली.  

 शिबिराची जबाबदारी शिबीर प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. महेशकुमार भैसारे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील चवळे, डॉ. डाकरे मॅडम यांनी पार पाडली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील डॉ. पवार सर, डॉ. राऊत मॅडम, डॉ. वरकडे सर, प्रा. जाधव सर, डॉ. वानखेडे सर, श्री डोंगरे जी, श्री गुनेश्वर जी, श्री दमाहे जी, श्री चकोले जी, श्री अभय राखड़े, श्री अभय उज्जैनवार व सर्व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here