मुंबई-गोवा महामार्गांवरील आंबेवाडी बाजारपेठेत गटारावरील स्लॅप कोसळून रस्त्याच्या मध्यभागी मोठा भगदाड,
ठेकेदाराने केलेले काम निस्कृष्ठ दर्जाचे, सुदैवाने फोरव्हीलर स्वार थोडक्यात बचावला
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
कोलाड :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील रोहा बाजुकडे जाणाऱ्या रहदारीच्या मुख्य चौकात गटाराच्या वरती रस्त्याला मोठे भगदाड पडला असुन या भल्यामोठया खड्ड्यात फोरव्हीलर स्वार जाता जाता सुदैवाने थोडक्यात बचावला असुन यामुळे ठेकेदारांनी केलेले काम किती? निस्कृष्ठ दर्जाचे आहे हे सिद्ध झाले आहे.
मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66, लाआज सकाळी , जण आक्रोश समिती च्या वतीने पाहणी दौरा करण्यात आला होता
त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला हा खड्डा 48 तासाच्या च्या आत नियमानुसार. बुजवण्यास यावा असे संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आलेले आहे
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली आठरा वर्षांपासून सुरु आहे.अनेकवेळा या महामार्गाची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,तसेच दोन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली व हे काम येत्या गणपती उत्सवापूर्वी पूर्ण होईल असे सांगितले आहे.परंतु फक्त “तारीख पे तारीख, यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही कारण हे जनतेने डिसेंबर २०१८ पासुन आजपर्यंत दिलेल्या डेडलाईनचे जाहीरतीचे फलक लावून सहा वर्षा पासुन महामार्गाचे काम न झाल्याचे
पहिले आहे.
लोकांनेत्यांकडून फक्त अनेकवेळा मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली आहे परंतु निस्कृष्ठ दर्जाचे काम केलेला ठेकेदाराला कोणीही जाब विचारत नसल्यामुळे ठेकेदाराची मनमानी सुरु आहे असे दिसून येत आहे हे आंबेवाडी बाजारपेठेत भर रहदारीच्या चौकात गटाराच्या बाजूला पडलेल्या मोठया भगदाडावरून दिसून येत आहे.तसेच विविध ठिकाणी निस्कृष्ठ दर्जाचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे यामध्ये कोलाड गोदी नदीवरील जुना पुल तसाच ठेऊन दोन्ही बाजूचे कठडे नवीन बांधण्यात आले आहेत तसेच वाकण जवळील गोडसई गावानजिक पुलाची अवस्था तशीच आहे.भुवन गावानजिक पुलाचा पत्ताच नाही तर कठडे अजूनही तुटलेल्या अवस्थेत आहेत.या महामार्गाचे काम वेगात करण्याच्या नादात अशी कामे सुरु असल्याची दिसून येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण्यासाठी पत्रकार, तसेच अनेक सामाजिक संघटना यांनी रस्तारोको करून आवाज उठवला.अनेक व्यावसायिक उद्योस्त झाले.त्यांना कोणतेही सबब न देता त्यांच्या दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आले. मग या कामाला १८ वर्षे झाली तरी हे काम पूर्ण होत नाही याला प्रशासनाचा नसलेला ठेकेदारावर नियंत्रण तसेच नियोजन शुन्य यामुळे अनेक वर्षे हे काम रखडली असल्याचे दिसून येत आहे. परंतु यामुळे असंख्य प्रवाशांना जिव गमवावा लागला आहे व त्यांचे कुटुंब उद्योस्त झाले आहेत.याला जबादार कोण?अशी संपप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.